वैजापूर औद्योगिक वसाहतसाठी संपादन केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात समन्वय बैठक

वैजापूर,३ जानेवारी /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील रोटेगांव परिसरात उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या पुढाकाराने शेतकरी व अधिकारी यांची समन्वय बैठक सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीने वैजापुर रोटेगाव, जरुळ, आघुर व लोणी बु. या चारही गावातील जवळपास चारशे शेतकऱ्यांच्या जमिनी 25 वर्षापूर्वी भूसंपादन केले आहे मात्र या जमिनींवर अद्याप कोणतेही उद्योग उभे राहिले नाहीत व त्या जमिनी अद्यापही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्या काळात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य भाव मिळालेला नाही त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आद्यपही प्रलंबित आहे.त्यामुळे आपण वैजापूर येथे एमआयडीसीचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेऊन समन्वय साधला तर त्या जमिनीचा वाढीव मावेजा शेतकऱ्यांना मिळेल व 25 वर्षापासुन प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागेल अशी विनंती आ.रमेश पाटील बोरणारे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना केली.

यावेळी संजयजी काटकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जे.के.जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे,  जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू जाधव, दिपकभाऊ राजपूत,शिवसेनेचे  तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी उपतालुकाप्रमुख मोहन पाटील साळुंके, उपसभापती राजेंद्र पा चव्हाण, सुनिल काका कदम, विभागप्रमुख प्रकाश पाटील मतसागर, किरण पाटील जगताप, अर्जुन गायकवाड, सरपंच गणेश पा इंगळे आदी उपस्थित होते.