आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त असंघटित कामगारांना सुरक्षा संच वाटप

तब्बल २०० असंघटित कामगारांना सुरक्षा संच वाटप

औरंगाबाद,५ डिसेंबर /प्रतिनिधी:-असंघटित कामगार संघटनेच्या वतीने शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम तसेच विविध क्षेत्रात काम करणारे फिटर, वेल्डर, पेंटर, मजूर अशा असंघटित कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच चे वाटप आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते आज करण्यात आले. तब्बल एकूण २०० कामगारांना सुरक्षा संच देण्यात आले.

या सुरक्षा व अत्यावश्यक संच मध्ये पेटी,चटई , मच्छरदानी ,बॅग, जेवणाचा तीन ताळी डबा, सोलार टॉर्च ,पाणी बॉटल ,सेफ्टी बेल्ट , बुट ,मास्क, एअर प्लग , सेफ्टी जॅकेट , हँड ग्लोज , हेलमेट या वस्तूंचा समावेश आहे. हा कार्यक्रम मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालय क्रांतीचौक या ठिकाणी घेण्यात आला होता. याप्रसंगी उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, उपशहरप्रमुख वसंत भाई शर्मा,  असघटीत कामगार सेना जिल्हा संघटक जयदीप झाल्टे, शहर संघटक सुनिल शिंदे, विभागप्रमुख पवन जैस्वाल, असंघटीत कामगार सेना जिल्हा कार्य संघटक डॉ.विजय जाधव ,महिला आघाडी जयश्री कुलकर्णी ,मंगल मोटे ,पूजा शिंदे ,साक्षी शिंदे ,राणी जाधव ,डॉ,सुजाता देशमुख ,सरीता जाधव ,सुकन्या जाधव ,साक्षी  दोडवे ,पुजा महाडीक , उपशाखाप्रमुख बाळु खंडागळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे शहर संघटक सुनील शिंदे यांनी केले होते.