वैजापूर तालुका संजय गांधी निराधार समिती गठीत करा – आ. रमेश पाटील बोरणारे

संजय गांधी व श्रवनबाळ योजनेच्या 5 हजार 479 लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे पत्र वाटप 

वैजापूर,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या नवीन मंजुर झालेल्या 5 हजार 479 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी (ता.15) करण्यात आले.

श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निराधार, अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या अशा सर्व दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना राबविण्यात येत आहे. असे आ. बोरणारे यावेळी बोलतांना म्हणाले. श्रावणबाळ, संजय गांधी स्थायी समिती गठण करावी व लाभार्थ्याना अनुदान लवकर मिळावे म्हणून आपण विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देतांना लवकरच समिती गठीत करण्याचे आश्वासन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिले होते असे आ.बोरणारे म्हणाले.

लाभार्थ्यांच्या थकीत अनुदान व  प्रलंबित प्रकरणासंदर्भात आ. बोरणारे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे श्रावणबाळ योजनेचे 3 हजार 500 लाभार्थी व संजय गांधी निराधार योजनेचे 9 हजार लाभार्थी एकूण 12 हजार 500 मंजुर असलेल्या लाभार्थ्याचे 8 कोटी 50 लाख रुपये थकित अनुदान मंजूर झाले तसेच या योजनेपासुन कित्येक लाभार्थी वंचित असल्याने त्याचा देखील पाठपुरावा करून नवीन 5 हजार 479 लाभार्थ्याची प्रकरणे मंजुर झाल्याने त्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आ. बोरणारे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले व उर्वरित वंचित असलेल्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न कारणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपविभागीय जिल्हाअधिकारी माणिकराव आहेर, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष  साबेरखान अमजदखान, पंचायत समितीचे  माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, तहसीलदार राहुल गायकवाड, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, गटविकास अधिकारी एच. आर. बोयनर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख पद्माताई साळुंके, महेश बुणगे, डॉ.संतोष गंगवाल यांच्यासह पदाधिकारी व ग्रामीण भागातून आलेले जेष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.