वैजापूर तालुक्यात “न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत फिरते न्यायालय

वैजापूर,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुका विधी सेवा समिती व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत तालुक्यात फिरते न्यायालय आयोजित करण्यात आले आहे.

“न्याय आपल्या दारी” तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.14) वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे सकाळी 9.30 वाजता व जातेगाव (टेंभी) येथे दुपारी 12.30 वाजता  तसेच 15 सप्टेंबर  2022 रोजी सकाळी 9.30 वाजता डवाळा येथे फिरते न्यायालय तर दुपारी 2 वाजता  न्यायालयात लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला व गोरगरीब यांना कायदेविषयक जनजागृती व्हावी यासाठी “न्यायालय आपल्या दारी” हा कायदेशीविषयक उपक्रम घेण्यात येत असल्याची माहिती वैजापूर जिल्हा न्यायाधीश एम.मोहियोद्दीन एम. ए. यांनी दिली.

या कार्यक्रमात विविध कायदे विषयक माहिती  जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर, दिवाणी न्यायाधीश आर. एन. नेरलीकर, न्यायाधीश मर्क देणार आहेत. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अँड. किरण त्रिभुवन, सचिव वैभव ढगे, उपाध्यक्ष अँड.व्ही.जी.वाघ, कोषाध्यक्ष अँड.नितिन बोराडे, अँड प्रमोददादा जगताप,, अँड सोपान पवार, अँड. पी. एस. साखरे, अँड. शरद हारदे, अँड. शंकर गोरे, अँड. दत्ता जाधव, अँड. महेश कदम, अँड.नितीन बावचे, अँड अनिल रोठे, अँड. देवदत्त पवार आदी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत .या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी केले आहे