सैनिक दलातील कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांना निवेदन

वैजापूर,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- सैनिक दलातील विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी 2020  ते 1 जुलै  2021 या 18-19 महिने कालावधीतील महागाई भत्ता अद्यापही मिळालेला नाही तो थकीत महागाई भत्ता दिवाळी पूर्वी मिळावा अशी मागणी करणारे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना,भागवत कराड यांना  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सेवानिवृत्त कर्मचारी गौतम गायकवाड यांनी रविवारी औरंगाबाद येथें दिले. सदरील थकीत भत्ता दिवाळी पूर्वी द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.या प्रसंगी अनिल वाणी, उत्तम पवार, चांगदेव उघडे, कल्याण गायकवाड व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.