नियमावलींच्या पालनासह निधीचा योग्य विनियोग करावा- राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

औरंगाबाद,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- जनसामान्यांच्या जीवनमानात गुणवत्तापूर्ण बदल आणि यंत्रणांचे बळकटीकरण या बाबी मध्यवर्ती ठेवून विविध योजनांतर्गत प्राप्त निधीचा विनियोग नियमांच्या अधिन राहून प्रभावीपणे करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागार यांनी आज येथे केल्या.

Displaying DPC MEETING-5.jpg

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मराठवाडा विभागातील जिल्ह्यांच्या 2018 ते 2021 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजनांतर्गत तसेच  कोविड-19 च्या अनुषंगाने प्राप्त निधी व खर्च याबाबतची आढावा बैठक श्री. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मराठवाडा विभागातील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (औरंगाबाद), डॉ.विजय राठोड (जालना), राधाबिनोद शर्मा (बीड), बी.पी.पृथ्वीराज (लातूर), कौस्तुभ दिवेगावकर (उस्मानाबाद), जितेंद्र पापळकर (हिंगोली), उपायुक्त (नियोजन) रवींद्र जगताप, तसेच विभागातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे; औरंगाबाद, मनुज जिंदाल; जालना, वासुदेव सोळंके; बीड, अभिनव गोयल; लातूर, राहुल गुप्ता; उस्मानाबाद, संजय दायनी; हिंगोली  उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात पोटनिवडणूक असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी व अधिकारी या बैठकीस अनुपस्थित होते. तसेच विधानमंडळ अंदाज समितीचा परभणी जिल्हा दौरा असल्याने परभणीचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पूर्वपरवानगीने अनुपस्थित होते.

Displaying DPC MEETING-3.jpg

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात सर्व जिल्ह्यांनी कोविड-19 रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवल्याबाबत समाधान व्यक्त करुन श्री.क्षीरसागर यांनी आपण कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज ठरणारी उपचार यंत्रणा उभी केली आहे त्या पार्श्वभूमीवर चाचण्या, लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषधोचार, दवाखान्यांचे फायर ऑडिटसह अधिक सतर्क असावे. नागरिकांच्या आरोग्यासह जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीचा प्रयत्न नावीन्यपूर्ण योनजेतून होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शिक्षण, आरोग्य, सक्षम मनुष्यबळ, उत्पन्न वाढ, इत्यादी मानव विकास निर्देशांक वाढीच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक गरजेनुसार नावीन्यपूर्ण योजनांअंतर्गत कामांचा समावेश करावा. कोविड प्रतिबंधासाठी विभागात औरगाबाद, उस्मानाबाद, लातूरसह इतर जिल्ह्यांनी उत्त्म काम केले असून नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या माध्यमातून जनतेच्या एकंदरीत जीवनमानात गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणणे शक्य होईल. त्याचसोबत  विविध शासकीय यंत्रणांतील अधिकारी-कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी विविध उपयुक्त उपक्रम राबविणे, यंत्रणा बळकटीकरण या बाबींना प्राधान्य देण्याचे श्री.क्षीरसागर यांनी सूचित केले

तसेच पुढील वर्षी छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत आहे. शाहू महाराजांनी घडवून आणलेल्या क्रांतीकारक सुधारणा शालेय, महाविद्यालयीन तसेच जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात राजषी शाहू महाराज यांच्या नावे अध्ययन केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांना केल्या. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यानांमध्ये स्मारक उभे करुन यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, ओपन जीम, कला दालन आदी बाबींची व्यवस्था करण्याचेही सूचित केले.

विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी यावेळी विभागाची माहिती देऊन दुष्काळ, अतिवृष्टी व पूरस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. तसेच कोविड-19 संसर्गाच्या दोन्ही लाटेमध्ये प्रभावीरित्या विभागातील विविध जिल्ह्यांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्हा नियोजन अधिकारी श्री.झुंजारे; औरंगाबाद, सुनील सूर्यवंशी; जालना, श्रीमती अपर्णा गुरव; बीड, किरण गिरगावकर; हिंगोली, के.जी.परदेशी; परभणी यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

औरंगाबाद विभागातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन-2020-21 प्राप्त निधी व खर्चाचा तपशील

(रुपये कोटीत)

अ.क्र.जिल्हामंजूर नियतव्ययमार्च 2021 अखेरआहरीतनिधी / खर्च
1औरंगाबाद325.50325.49
2जालना235.00234.57
3परभणी200.00200.00
4बीड300.00297.87
5नांदेड315.00315.00
6हिंगोली135.00135.00
7लातूर240.00239.95
8उस्मानाबाद260.80259.40
एकूण2011.302007.28

औरंगाबादविभागातीलजिल्हावार्षिकयोजना (सर्वसाधारण) सन 2019-20, 2020-21 मध्ये कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाययोजना अंतर्गत झालेला खर्चाचा तपशील (रुपये कोटीत)

2019-202020-21
अ.क्र.जिल्‍हाप्रशासकीयमान्यता रक्कमखर्चप्रशासकीयमान्यतारक्कमखर्च
010203040506
1औरंगाबाद14.399914.399953.588748.6580
2जालना12.600012.600021.538521.5385
3परभणी2.98882.988630.830530.8305
4नांदेड13.550013.550051.983051.9750
5बीड11.923711.923754.597853.1414
6लातूर3.25003.246327.840224.8307
7उस्‍मानाबाद5.88505.885026.955526.8729
8हिंगोली2.27952.279521.970313.9038
एकूणविभाग 66.876866.8730289.3045271.7508

औरंगाबादविभागातीलजिल्हावार्षिकयोजना (सर्वसाधारण) सन 2021-22 मध्ये कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाययोजना अंतर्गत अनुज्ञेय निधी, दिलेल्या मंजूऱ्या, वितरीत निधी व झालेला खर्चाचा तपशील (रुपये कोटीत)

अ.क्र.जिल्‍हामंजूरनियतव्ययकोविड-19 उपाययोजना व आरोग्य/वैदयकीय योजनांकरीताअनुज्ञेयनिधी (मंजूरतरतूदीच्या 30%)शासनाकडूनप्राप्त निधीएकूण प्रशासकीय मान्यता रक्कमजिल्‍ह्यांनीवितरीतकेलेलानिधीखर्चझालेलानिधी
1औरंगाबाद365.00109.5000365.0042.608832.730424.3981
2जालना260.0078.0000260.0021.354017.980413.5100
3परभणी225.0067.5000225.0031.564131.564130.5913
4नांदेड355.00106.5000355.0020.066110.91679.0818
5बीड340.00102.0000340.0020.211211.989511.9895
6लातूर275.0082.5000275.0035.648820.631216.2917
7उस्‍मानाबाद280.0084.0000280.0015.76014.66994.6690
8हिंगोली160.0048.0000160.0024.842113.483113.4831
एकूण विभाग 2260.00678.002260.00212.0552143.9654124.0145

            विभागतील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजना, कोविड-19 निधी वापरातंर्गत करण्यात आलेल्या कामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्याचबरोबर विविध सूचनाही केल्या.