धोंदलगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आ.बोरणारे यांच्यातर्फे सत्कार

औरंगाबाद,२५ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थांनी आमदार रमेश पाटील बोरणारे यांची भेट घेतली.

आ.बोरणारे यांनी  सेवा सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब पाटील आवारे, व्हाईस चेअरमन नरसिंग जारवाल, कवरसिंग बैनाडे, विष्णू पानसरे, वसंत वाघ, मधुकर शिंदे, किरण डमाळे, एकनाथ थोकळ, भारतीताई ठोंबरे, सविताताई आव्हाळे या सर्व संचालकांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, रावसाहेब काका वाघ, उपविभागप्रमुख विठ्ठल पगार, सुरेश पानसरे, मा सरपंच कैलास आवारे, वसंत नाना वाघ, राजेंद्र पा वाघ, नरेंद बैनाडे, भाऊसाहेब आव्हाळे, राजुभाऊ जारवाल, गुलचंद काकरवाल, किशोर आवारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.