मुंबई येथील मेळावा आटोपून परत निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकाची नारंगी धरणात उडी

वैजापूर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहराजवळील नारंगी मध्यम प्रकल्पाचे पाण्यात उडी मारुन आश्चर्यकारकपणे बेपत्ता झालेला यवतमाळ येथील 50 वर्षीय शिवसैनिक दिनेश महादेव सोनवणे शुक्रवारी रोटेगाव शिवारात सुखरुप आढळून आले. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस अग्निशमन दलाचे पथक रात्रीपासून धरणात बोटीचे माध्यमातून कार्यरत होते.त्याचा 25 तासानंतर ठावठिकाणा लागल्यामुळे पथकाने नि:सुटकेचा दीर्घ श्वास घेतला.

सोनवणे पाण्यात गायब झाल्यामुळे त्यांचे जोडीदार रात्री पासून वैजापूर येथे थांबलेले होते.त्यांच्याकडे सोनवणेना सोपविण्यात  आले. कॅबिनेट  मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील सोनवणे रहिवासी आहेत. मुंबईहून शिव सेना मेळावा आटोपून ते वैजापूर मार्गे यवतमाळ कडे जाताना वैजापूरला  थांबले होते.बसमधील दिनेश महादेव सोनवणे हे नौगजी बाबा दर्गा येथे दर्शनाला गेले होते.त्या दरम्यान दर्गाचे वरील बाजूने नारंगी धरणातील पाण्यात त्यांनी उडी मारुन बेपत्ता झाले होते.  त्यांच्या सोबतचे लोकांनी पोलीस दलाचे ११२ क्रमांकाद्वारे कळवल्यामुळे होती.वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी हवालदार संजय घुगे, प्रशांत गिते यांचे पथक धरणाकडे पाठवले होते.पाण्यात अडकलेली व्यक्ति पाण्यातील झाडाला अडकून असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.आमदार रमेश बोरनारे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिथे धाव घेतली होती.धरणात ९७ ते ९८ टक्के पर्यत काठोकाठ जलसाठा असल्यामुळे बेपत्ता व्यक्तिचा स्थानिक यंत्रणेला शोध घेणे अवघड झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी औरंगाबादहून विशेष रेस्क्यू बचाव पथकाला वैजापूरला पाचारण केले होते.रात्री पासून पथक पाण्यात त्यांचा कसून शोध घेत होते.प्रकल्पा लगतचे एका मका पिकांचे शेतात सोनवणे आढळून आले.