महालगाव येथे वेलंकनी माता तीर्थक्षेत्र कमानीचे भूमीपूजन

वैजापूर,३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील बाजाठाण फाटा या ठिकाणी वेलंकनी माता तीर्थक्षेत्र नावाच्या कमानीचे भूमिपूजन बुधवारी (ता.3) जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्याहस्ते झाले.
याप्रसंगी बिशप स्वामी रिबेलो, फादर आशिष मस्के, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख डॉ.प्रकाश शेळके, बाजार समिती संचालक सुरेश अल्हाट, शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र पाटीलहूमे, मंगेश गायकवाड, सोसायटीचे संचालक चार्लस अल्हाट, विकास जाधव, सतीश आल्हाट यांच्यासह महालगाव व माळी घोगरगाव प्रमुख मंडळी, सिस्टर्स उपस्थित होते.