वेद वाचता आला नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजे – भागवताचार्य देवी वैभवी

वैजापूर येथील क्रांती नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-समाजातील नागरिकांना वेद वाचता आला नाही तरी चालेल परंतु समाजातील दीन ,दुबळे,गोर,गरीब यांच्यावेदना वाचता आल्या पाहिजेत असे अमृततुल्य विचार भागवताचार्य देवी वैभवी श्रीजी यांनी यांनी श्री देवी भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळ्यात मंगळवार रोजी केले.

भागवताचार्य देवी वैभवी श्रीजी पुढे म्हणाल्या की, आज मानवी जीवनात नाना तऱ्हेच्या वेदना आहेत,त्या वेदना बाजूला सारण्याचे काम देवी भागवत हे महापुराण करते या साठी देवी भागवत कथा श्रवण करून जीवनवेदना मुक्त करावे व जीवन जगण्याचा आनंद घ्यावा.

या प्रसंगी ह.भ.प. अमोल महाराज गाढे व ह.भ.प. उत्तम महाराज गाढे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीत जि,प, सदस्य पंकज ठोंबरे,नगरसेवक दिनेश राजपूत,गणेश राजपूत,सोमु सोमवंशी यांची उपस्थिती होती सुत्रसंचलन व प्रास्तविक स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले.क्रांती नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष किरण व्यवहारे,उपाध्यक्ष प्रशांत सोमवंशी, सचिव राहुल कुंदे,कार्याध्यक्ष अमृत शिंदे,कोषाध्यक्ष गणेश पवार, सहसचिव गणेश अनर्थे,सहकोषाध्याक्ष मयूर राजपूत,उपकार्याध्यक्ष दीपक बोर्डे,व क्रांती मित्र परिवार यांनी सहभाग नोंदविला.