दसरा मेळावा :उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वैजापुरात शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैजापूर,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल शिवसेना पक्षाच्या बाजूने आल्यानंतर आज वैजापूर येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.


मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाला परवानगी दिल्याचा निकाल दिल्याचे समजताच तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होऊन फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.  
खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यावेळी म्हणाले.शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, शहर प्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश आल्हाट, युवासेना तालुकाप्रमुख विठ्ठल डमाळे, अक्षय भाऊ साठे, अनिल न्हावले, रमेश पाटील सावंत, भिकन  सोमासे, राजू पाटील गलांडे, राहुल साळुंखे, ऋषी राजपूत, गोरख गावडे, बाबासाहेब महाजन, योगेश पाटील मोहिते यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.