औरंगाबादचे प्रसिद्ध बिल्डरअनिल आग्रहारकर यांची आत्महत्या

औरंगाबाद,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- औरंगाबाद  शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अनिल आग्रहारकरांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनिल माधवराव आग्रहारकर (वय 55) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी 8.30 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ ते दहा दिवसांपासून व्यापारातील व्यावहारिक त्रास असल्याची माहिती परिवाराने दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

गेल्या काही वर्षांत ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून अग्रस्थानी होते. गतवर्षीच क्रेडाई या नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोषाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुटुंबासोबत संवाद साधून त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडेआठ वाजता मात्र ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. कुटुंबाने तत्काळ त्यांना फासावरून उतरून रुग्णालयात दाखल केले. दहा वाजता मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

शुभविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक एस. जे. गायके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आर्थिक कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिस तपासानंतर सत्य समोर येईल.