वैजापूर येथील जे.के.जाधव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे आ.बोरणारे यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर,२५ एप्रिल  /प्रतिनिधी :- येथील जे.के जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैजापूरतर्फे  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उदघाटन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते सोमवारी झाले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहूल गायकवाड, जे.के.जाधव, ग्रामीण साहित्यिक प्रा.भीमराव वाघचौरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, शशिकांत शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.जे.के.जाधव दादा यांनी तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित केले तसेच महाविद्यालयात युवकांसाठी आपल्या महाविद्यालयात स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.बोरणारे यांनी या प्रसंगी बोलताना केले.

आपल्याला जे.के.जाधव दादा व आई वडिलांच्या माध्यमातून ही खुप मोठी संधी मिळाली असून आपण त्या संधीच सोनं करा. सर्वांनी मोबाइलचा वापर कमी करावा कारण वेळ आणि काळ खुप महत्वाचा आहे ही वेळ जर संपली तर ती पुन्हा आयुष्यात कधी न येणारी वेळ आहे. त्यामूळे वेळ वाया न घालवता तयारीला लागा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्या असे आ.बोरणारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.