औरंगाबाद जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष पदी विजय द्वारकुंडे यांची नियुक्ती

औरंगाबाद,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार व कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री श्री विजय नवल पाटील यांच्या सूचनेनुसार सरकार्यवाह विजय गव्हाणे यांनी औरंगाबाद जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय द्वारकुंडे यांची नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीचे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व संस्था चालकांनी स्वागत केले असून मिलिंद पाटील, एस पी जवळकर, वाल्मिक सुरासे, प्रा. मनोज पाटील, पी एम पवार, भास्कर म्हस्के, विलास जाधव, शिवाजी चव्हाण, मोहन सोनवणे, प्रदीप पवार, सुनील वाकेकर यांनी अभिनंदन केले आहे