कोविड केअर सेंटर्समध्ये आवश्यक सुविधांसह जेवण उपलब्ध करून द्यावे

औरंगाबाद खंडपीठाचे महापालिका प्रशासनास आदेश

औरंगाबाद: कोविड केअर सेंटर मध्ये दर्जेदार जेवण आणि आवश्यक ती सुविधा पुरविण्यात  यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले.
शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने यासंबंधी जुलै महिन्यात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. महापालिका हद्दीतील कोविड केअर सेंटर मध्ये सुविधांचा आभाव असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. विलकीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या रूग्णांना चहा,कॉफी, नाश्ता, दुध, जेवण आदी दर्जेदार वेळेवर मिळावे असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते. टुथपेस्ट, ब्रश, कंगवा, तेल, गादी, उशी, चादर आदी दैनंदिन वापराच्या वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली होती. सुविधा नसल्याचे दोन विलगीकरण कक्षातील रूग्णांनी शपथपत्राद्वारे  स्पष्ट केले होते. २२ जूला विद्यापीठातील विलकीकरण कक्षात ठेवण्यात आले होते आणि २३ जून २०२० रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत चहा नाश्ता दिल्या गेला नव्हती असे संबंधित रूग्णांनी म्हटले होते. दुपारचे जेवण ३.४५ वाजता दिले तेही निकृष्ट दर्जाचे होते असेही त्यांनी शपथपत्रात म्हटले होते.अशा प्रकारे त्यांना २६ जून पर्यंत असुविधेमध्येच राहावे लागले.
खंडपीठाने २७ जुलैला मनपास नोटीस बजावून  याचिकाकर्त्यास पन्नास हजार रूपये अनामत स्वरूपात  जमा करण्याचे आदेश दिले  खंडपीठाने दिले होते.मनपा प्रशासक आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शपथपत्राद्वारे सुविधा देण्याचे मान्य केले होते. याचिकाकर्त्यांतर्फे स. एस. काझी तर
मनपातर्फे एस. डी. चपळगावकर यांनी काम पाहिले. याचिका निकाली काढताना याचिकाकर्त्याने जमा केलीृेली पन्नास हजार रूपयांची रक्कम परत
करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.