शिऊर येथील श्री शंकरस्वामी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे जाधव यांच्याहस्ते शुभारंभ

वैजापूर,​३०​ऑगस्ट  /प्रतिनिधी :- श्री शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर येथे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्या विकास निधीतून मंजूर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे अंदाजित रक्कम 7 लक्ष 70 हजार रुपये या कामाचा शुभारंभ सोमवारी शंकरस्वामी संस्थानचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.वैजापूर तालुक्यातील बहुसंख्य जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या शंकर स्वामी संस्थानच्या विकासासाठी माझं योगदान देऊ शकलो याचा मनापासून आनंद होतो असे पंकज ठोंबरे याप्रसंगी बोलताना म्हणाले.
याप्रसंगी शंकरस्वामी संस्थानचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे,सचिव बबन त्यात्या जाधव, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, विश्वस्त अनिल भोसले, शिवाजी साळुंके, प्रभाकर आढाव, शिवाजी जाधव, पंचायत समिती सदस्य विनायकबाबा गाढे, भालगाव चे सरपंच अमृत पाटील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळु आबा भोसले, माजी सरपंच निलेश देशमुख, भास्कर जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिरोळे,बाळा पाटील जाधव, बाळु मेंबर, अशोक चव्हाण, अकबरभाई शेख यांच्यासह समस्त वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.