भराडीच्या श्री.सरस्वती भुवन महाविद्यालयात लसीकरण मोहीम

भराडी,२९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील श्री सरस्वती भुवन उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विध्यार्थ्यांसाठी लसीकरण  शिबीर आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर प्राचार्य गणेशसिंग गौर, उपमुख्याध्यापक युवराज पाडळे, पर्यवेक्षक संजय दाभाडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा तानाजी मादळे,आरोग्यसेविका श्रीमती शारदा दरबस्तवार, श्रीमती किरण चरावंडे, श्रीमती रंजना दाभाडे, आरोग्यसेवक गजानन कालसरे, अनिकेत वाघ,लक्ष्मण सुरडकर , श्रीमती मीरा वनगुजरे, प्रा अमोल काटकर यांची उपस्थिती होती.

यावेळी श्रीमती दरबस्तवार यांनी, वैद्यकीय अधिकारी श्रीमती सायली शिंदे, विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवित असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना  कोविडची भीषणता स्पष्ट केली व लसीकरणाचे महत्व अत्यंत साध्या सोप्या शब्दात मांडले.
गजानन कालसरे यांनी लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली
प्राचार्य गौर यांनी, विद्यार्थ्यांनी लसीकरणाबाबत गावात आणखीन जागृती करून, लसीकरण दूत व्हावे असे आवाहन केले.

उपमुख्याध्यापक  पाडळे यांनी, कोरोना अजून संपला नसून दैनंदिन जीवनात विशेषतः सणासुदीच्या काळात घ्यावयाची खबरदारी समजावून सांगितली.पर्यवेक्षक संजय दाभाडे यांनी महामारीच्या काळात जपावे लागणाऱ्या मानसिक धैर्य, आधार यावर प्रकाश टाकून त्याचा मुकाबला करण्याचे आवाहन केले
प्रा मादळे यांनी सशक्त भारतासाठी लसीकरणाची आवश्यकता स्पष्ट केली.
यावेळी एकूण अठरा कोविशील्ड लस देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत अपसिंगेकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले