रोटेगावजवळ दुचाकीला कारची जोरदार धडक ; दोन जण ठार

वैजापूर,​७​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे जण ठार झाले. रविवारी (ता.7) दुपारी दीडच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक महामार्गावर रोटेगांवनजीक ही घटना घडली. भाऊसाहेब कारभारी पवार (50 वर्ष) व गौतम साखहरी बागुल (37 वर्ष) रा.खंडाळा ता.वैजापूर अशी अपघातात ठार झालेल्यांची नांवे आहेत.


भाऊसाहेब पवार व त्यांचा मित्र गौतम बागुल हे दोघे  सकाळी दुचाकी (क्रमांक.एम..एच.20,डी.जी.9559)
वरून गाडीचा हप्ता भरण्यासाठी रोटेगांव येथे आले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते दोघे परत खंडाळा येथे जात असतांना औरंगाबादहून वैजापूरकडे येणाऱ्या कारने (क्र.एम.एच.20, डी.जे. 5679) बाजरा संशोधन केंद्राजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भाऊसाहेब पवार हे जागीच ठार झाले तर त्यांचे मित्र गौतम बागुल हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे हवालदार किसन गवळी, मोईस बेग, उमेश जमघडे व गणेश पठारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तपासून पवार यांना मृत घोषित केले.या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले. याप्रकरणी कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.