नागपूर एनसीडीसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते भूमिपूजन

Image

नागपूर :  नागपूर येथील एनसीडीसी (नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) चे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आले. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रम मांडविया यांनी सहा राज्यात ऑनलाईन एनसीडीसीचे भूमिपूजन केले.

Image

माताकचेरी परिसरात झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत परांडा (जि.) उस्मानाबाद येथून व इतर अधिकारी मुंबई येथून सहभागी झाले होते. नागपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, डॉ. गिरीश घरडे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. विनिता जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, दिल्ली येथून आलेले एनसीडीसीचे अधिकारी श्री. अनिल पाटील व डॉ. अजित शेवाळे हजर होते.

एनसीडीसी ही राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य संस्था डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, कोरोना व्हायरस इत्यादी साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाची तपासणी करते. ही संस्था नागपूरमध्ये स्थापन व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत प्रयत्न केले आहेत.