बीड जिल्हयातील लॉकडाऊनचा कालावधीत वाढ

३० जुन २०२० रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत मनाई आदेश लागू – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. १ :- जिल्हयातील लॉकडाऊनचा कालावधी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वाढवलेला असून दिनांक ३० जुन २०२० रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४८ (१)(३) अन्वये रात्री १२.०० वा पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात येवून यासाठी विविध बाबींवरील प्रतिबंध आणि सवलतींच्या अनुषंगाने आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.जिल्ह्यामध्ये खालील गोष्टी प्रतिबंधित असतीलA. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी B. गृहमंत्रालय यांनी दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त इतर आंतराष्ट्रीय विमान प्रवास .C. विशेष परवानगी व स्वतंत्र रित्या आदेश निर्गमित केल्या व्यतिरिक्त इतर सर्व आंतरराज्यीय हवाई सेवा व रेल्वे प्रवासD. सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरणिका, मनोरंजन पार्क,थिएटर्स, प्रेक्षागृहे,सभागृहे आणि तत्सम सर्व जागाE. सर्व सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्य व इतर संमेलने व जमावास बंदीF. सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.1. शॉपिंग माल्स, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी केवळ पार्सल/घरपोच सेवा चालू राहिल.२. प्रवासी व्यक्ती तसेच मालवाहतूकी संदर्भात ठराविक प्रकरणात विशिष्ट निर्देशA. सर्व अंतरराज्यीय व राज्यांतर्गत प्रवासासाठी वैद्यकीय व्यवसायिक, नर्सेस व पॅरामेडिकल स्टॉफ इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी व रुग्णवाहिका यांना कोणतेही बंधन असणार नाही. इतर सर्वांचा प्रवास आज ज्या पध्दतीने नियंत्रित आहे त्याच पध्दतीने नियंत्रित राहिल आणि वेळोवेळी आलेल्या आणि येणाऱ्या शासनांच्या मार्गदर्शक सूचना (S.O.P.) प्रमाणेचराहिल.B. सर्व प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस तसेच रिकाम्या ट्रकच्या वाहतूकीस राज्यातंर्गत परवानगी दयावी. सर्व प्रकारची मालवाहतूक आज जशी चालू आहे तशीच चालू राहील.C. शेजारील राष्ट्रांशी झालेल्या करारानुसार सीमेपलीकडे घेऊन जाण्याच्या मालवाहतूकीस कोणताही अडथळा असणार नाही.३. या गोष्टींना यापूर्वीच परवानगी देण्यात आलेली आहे त्या खालील अटीवर कायम राहतील.A. परवानगी दिलेल्या कृतींना नव्याने शासना कडून परवानगीची आवश्यकता राहणार नाही.B. क्रिडा संकुले, क्रिडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील,पंरतु प्रेक्षक व सामूहिक क्रिडा/ व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही.C. क्रिडा संकुलातील अंतरगृहात कृतींना (Indoor) परवानगी राहणार नाही. सर्व शारीरीक व्यायाम व कृती या सामाजिक तथा अंतराचे अटींचे पालन करुन करण्यात याव्यात. *सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणार्‍यां व्यक्तींनी गाडीतील एकूण प्रवासी संख्येच्या मर्यादा नियमांचे पालन करावे.*१. दुचाकी: एक चालक२.तीन चाकी:- एक चालक+ दोन प्रवासी३.चार चाकी: एक चालक+ दोन प्रवासीE. जिल्ह्यांतर्गत बस सेवेला क्षमतेचे ५० टक्के प्रवासी भागासह व सामाजिक अंतर व *खातेचे नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येते.F. जिल्ह्याबाहेरील बस प्रवासास परवानगी देण्यात येणार नाही. त्याबाबत वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.G. सर्व आस्थापना/ दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वा पर्यंत दररोज चालू राहतील. सदर ठिकाणी गर्दी झाल्यारा अथवा सामाजिक अंतर न राखले गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरीत अशी दुकाने बंद करतील,४. कन्टेनमेंट झोन (Containment Zone) मधील भागाचे नियमन त्यांच्यासाठी काढलेल्या विशेष आदेशातील तरतुदीप्रमाणे करण्यात येईल,कन्टेनमेंट झोन (Containment Zone) मध्ये जीवनावश्यक गोष्टींना परवानगी राहील व कन्टेनमेंट झोन, (Containinont Zone) च्या क्षेत्रामध्ये कोणतीही व्यक्ती हालचाल करणार नाही यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच केवळ अतितात्काळ वैद्यकीय सेवा व जीवनाश्यकवस्तूंचा पुरवठा यास परवानगी राहील. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे अवलोकन करावे.आरोग्य सेतु अॅपचा वापरA. आरोग्य सेतु अॅपमुळे विषाणूच्या संसर्गाचे संभाव्य जोखमीची लवकर ओळख होते व त्यामुळे सदर अॅप वैयक्तीक तसेच सामूहिक ढाल म्हणून कार्य करते.B. प्रत्येक कार्यालयाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड केले असले बाबत खात्री करावी. तसेच जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीने हे अॅप वापरावे.६. असुरक्षित व्यक्तींची सुरक्षा ६५ वर्षापेक्षा जास्त वयांच्या व्यक्ती ज्यांना जुने आजार आहेत, गर्भवती महिला व १० वर्षाखालील वयांची मुले यांना जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर कधीही पडता येणार नाही.७. रात्रीची संचारबंदी जीवनाश्यक सेवा व्यतिरिक्त वैयक्तीक हालचालींना संध्याकाळी ७.०० ते सकाळी ७.०० या पर्यंत संचारबंदी लागू असेल.कोवीड-१९ चे व्यवस्थापना संदर्भात राष्ट्रीय निर्देशA. चेहरा झाकणे :- सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येते.B. सामाजिक अंतर:- सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने कमीत कमी सहा फुटांचे अंतर राखावे. दुकानदारांनी दुकानामध्ये ग्राहकांचे सामाजिक अंतर राखावे व एका वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना दुकानात येण्यापासून प्रतिबंध करावे.C. संम्मेलने:- मोठया संख्येने लोक जमतील अशी संम्मेलने यांना प्रतिबंध राहील.विवाह विषयक:- ५० पेक्षा जास्त पाहुण्यांनी एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.अंत्यविधी:- २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.D. सक्षम प्राधिकाऱ्यांनी नियम अटी व कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून निर्देशित केल्यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.E. सार्वजनिक ठिकाणी दारुपिणे, पान, तंबाखुचे सेवन करणे यास प्रतिबंध राहील,कामाच्या ठिकाणी अतिरिक्त निर्देशF. वर्क फ्रॉम होम :- शक्यतो घरात राहून काम करण्याच्या पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यालयांमध्ये, दुकानांमध्ये, मार्केटमध्ये आणि औद्यगिक व्यवसायिक आस्थापनांमध्ये वेगवेगळया कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे वेगवेगळे तास निश्चित करण्यात यावेत.G.स्क्रिनिंग तपासणी व स्वच्छता:- सर्व प्रवेशाच्या व बाहेर पडण्याच्या ठिकाणी सामाजिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची व्यवस्था व सॅनीटायझरची व्यवस्था करण्यात यावी.H. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी मानवाच्या संपर्कात येणाऱ्या दरवाज्यांचे हॅन्डल इ.याचे नियमित सॅनीटायझेशन करण्यात यावे.1. सामाजिक अंतर:- कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सर्व व्यक्तींनी कामगारांमध्ये पुरसे अंतर असल्याची खात्री करावी. दोन शिफ्टमध्ये दरम्यान पुरेसा कालावधी असावा व स्टाफच्या जेवण्याची वेळ वेगवेगळी निश्चित करण्यात यावी.राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसारअधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिलाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. यापूर्वी बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रियासंहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते. त्यात वाढ झाली असून दिनांक ३० जुन २०२० रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत पर्यंत मनाई आदेश लागू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.