नांदेड जिल्ह्यात 159 बाधितांची भर तर दोन जणांचा मृत्यू

211 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड , दि. 8 :- गुरुवार 8 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 211 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 159 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 118 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 98 अहवालापैकी 912 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार एवढी झाली असून यातील 13 हजार 687 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 762 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 65 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवार 7 ऑक्टोंबर रोजी विसावानगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, सिडको नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 448 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 90 हजार 115,निगेटिव्ह स्वॅब- 69 हजार 761,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 687,एकूण मृत्यू संख्या- 448,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 83.20 आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 707, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 762,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 65.