डॉ. पी.यु.परदेशी यांच्या स्मरणार्थ वैजापूर येथे आयोजित सर्व रोग निदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

वैजापूर ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैद्यकीय व्यवसायाला व्यवसाय न मानता गोरगरीब व सामान्य जनतेची  आरोग्य सेवा करणारे व वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले वैजापूर येथील डॉ.पी.यु.परदेशी यांच्या स्मरणार्थ येथे आयोजित सर्व रोग निदान शिबिरास आज उत्तम प्रतिसाद मिळाला.शहर व ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Displaying IMG-20220202-WA0091.jpg

शहरातील आसरा फाऊंडेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,आत्मा मलिक हॉस्पिटल व साईबाबा मेडिकल हब कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी व नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या सहकार्याने  येथील वसंत क्लबच्या मैदानावर आयोजित या सर्व रोग निदान शिबिराचे उदघाटन आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, दलित मित्र डॉ.व्ही.जी.शिंदे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, मेजर सुभाष संचेती, आत्मा मलिक हॉस्पिटलचे डीन डॉ.सुमन यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, माजी नगराध्यक्ष राजुसिंग राजपूत, शेख अकिलसेठ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, विधिज्ञ प्रमोददादा जगताप,आसाराम पाटील रोठे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, मजीद कुरेशी, खुशालसिंग राजपूत, सावन राजपूत, विजय दायमा, कल्याण पाटील जगताप, नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण, दशरथ बनकर, राजेश गायकवाड, स्वप्नील जेजुरकर, सुप्रिया व्यवहारे,अनिता तांबे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, सूर्यकांत सोमवंशी, सय्यद हिकमत, अल्ताफ बाबा, ज्ञानेश्वर शिरसाठ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दीप प्रज्वलन व स्व.डॉ.पी.यु.परदेशी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिबिरास सुरुवात झाली. आसरा फाउंडेशनचे वाहेद पठाण, झाकीर कुरेशी, शकील तांबोळी,नवीद खान,सरफराज शेख,अझहर खान, मुस्तकीम खान, साबे खान यांनी मान्यवरांचे स्वागत केले.आ. बोरणारे यांनी स्व.डॉ.पी.यु.परदेशी यांच्या आरोग्य सेवेचा यावेळी गौरव केला.शिबिरात आत्मा मलिक हॉस्पिटल साईबाबा मेडिकल हब कोकमठाणचे डीन डॉ.सुमन, डॉ.अशोक मदणे,डॉ.इंद्रनील वाघ, डॉ.हर्षद आढाव, डॉ.सोनल घोटे, डॉ. मेहेरबानसिंग, डॉ.कुंदन गोरे या तज्ञ व अनुभवी डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला.

नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता निकाळे, पर्यवेक्षक एम.आर.गणवीर, ज्ञानेश्वर शिरसाठ यांनीही सहभाग घेतला होता. सायंकाळी पांच वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. शेवटी डॉ.दिनेश परदेशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.