उच्च दाबाने व पूर्णवेळ विद्युत पुरवठा व्हावा यासाठी हिंगोणी व परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :- अनधिकृत विद्युत भार काढून उच्च दाबाने व पूर्णवेळ  विद्युत पुरवठा करण्यासाठी वेळ देऊन ही काहीही कार्यवाही न झाल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात हिंगोणी व परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने आज हिंगोणी येथे आत्मदहन आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त भार काढून आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन वीज वितरणचे अभियंता विरांग सोनवणे यांनी दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

या आंदोलनात हिंगोणी, कांगोणी व  नारायणपूर परिसरातील काकासाहेब चंदणे, रवींद्र निकम, बाळासाहेब घंगाळे, नानासाहेब बोडखे, सुनील गिरे, मदन थोरात, उध्दव थोरात, सरपंच बाळासाहेब मेंडकर, अमोल बोठे, मधुकर चंदणे, नारायण बोटे, गणेश दांडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विराग सोनवणे, वायरमन आसिफ सय्यद, सहपोलिस उपअधीक्षक श्री. खरड व त्यांचे सहकारी उपस्थित होते