जातीवाचक शिविगाळप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा

वैजापूर,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- दुचाकीने धडक देऊन दोघांना जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी सोनु राजपूत (रा. वैजापूर) याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

याप्रकरणी भिलाटी भगवती देवी मंदिर येथील शंकर प्रकाश सोनवणे यांनी पोलिसांत तक्रार दिल्याऩतर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांची दोन मुले बादल व आदित्य ही गावातून घरी येत असताना सोनु राजपूत यांच्या स्कुटीने बादल यास धडक दिली. त्यामुळे बादल यांच्या खांद्याला मार लागला. याबाबत विचारणा केली असता सोनु याने बादलला मारहाण केली. आदित्य समजावण्यास गेला असता त्यालाही सोनुने मारहाण केली व जातीवाचक शिविगाळ करुन आमच्या नादी लागाल तर जिवे मारुन टाकु अशी धमकी दिली. याप्रकरणी सोनु राजपूत याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह अन्य कलमाखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत करीत आहेत.