महात्मा फुले यांच्या साहित्याचा जागर करण्याची आज आवश्यकता – डॉ. रवींद्र ठाकूर

वैजापूर,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- महात्मा जोतीराव फुलेंचे कार्य म्हणजे विशाल महासागर होय त्यांनी सदैव संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा सकारात्मक विचार केला व त्याप्रमाणे साहित्य कृतीत उतरविले असे प्रतिपादन कादंबरीकार व समीक्षक प्रा. डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी बुधवारी (ता.27) येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचेदुसरे पुष्प गुंफताना केले.  

ते पुढे म्हणाले की,”वेद म्हणजे भेद “होय म्हणूनच तर महात्मा जोतिबा फुले यांनी वेदांचे तत्व नाकारले,  आज देशात अत्यंत भयावह स्थिती आहे. धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे जे षडयंत्र चालू आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून आज फुलेंच्या साहित्याचा जागर करण्याची नितांत गरज आहे नसताआधीपासूनच भरडत आलेली जनता अशीच पुढे भरडत राहणार असेही त्यांनी नमूद केले. 

अध्यक्षस्थानी स्थानिक  नियामक समितीचे सदस्य जेष्ठ विधीज्ञ प्रमोददादा जगताप होते. स्थानिक समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, प्राचार्य डॉ,शिवाजीराव थोरे, श्रीमती आनंदीताई अन्नदाते, माजी प्राचार्य बी.एस.जाधव, माजी शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक धोंडिरामसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचलन प्रा.राजेश कोळेकर यांनी केले तर आभार प्रा,बाळासाहेब गायके यांनी मानले.

मराठी विभागप्रमुख व संयोजक डॉ.महेश खरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य डॉ.डी.एस.साळुंके, डॉ.एस.डी.परदेशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.डॉ.ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रा. गणेश पवार ,महाविद्यालयाचे  प्रबंधक विजय आहेर यांनी सहभाग नोंदविला,जेष्ठ नागरिक रामकृष्ण साठे, दिलीप अनर्थे, बाबासाहेब जगताप यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.