मैदानी स्पर्धेत प्रतिक्षा आणि गीता यांचा डबल गोल्डन धमाका

औरंगाबाद ,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे विद्यापीठात नुकत्याच झालेल्या २० वर्षाखालील मुला व मुलींच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत प्रतीक्षा वास्के ने १०० मीटर व लांब उडी मध्ये तर गीता वेलनेस्कर ने गोळाफेक व थालीफेक मध्ये सुवर्णपदक जिंकत डबल गोल्डन धमाका केला. 
निकाल-(मुली) 100 मीटर धावणे: १. प्रतीक्षा वास्के, २. कोमल जरारे, ३. तृप्ती सातारकर, 200 मीटर धावणे: १. स्वाती वटाणे, २. तुप्ती समारकर, ३. निशा दिवेकर, 400 मीटर धावणे: १. अश्विनी वाघ, २. सुरेखा बोरकर, ३. निशा दिवेकर, 800 मीटर धावणे: १. वैष्णवी श्रीखंडे, २. ज्योती सुरासे, ३. भूमिका कसबे, १५०० मीटर धावणे: १. मयुरी सोनीट, २. प्रीति चव्हाण, ५००० मीटर धावणे: १. कविता पुरी, २. शुभांगी, ३. निकिता आहेर, गोळा फेक: १. गीता वेलनेसकर, २. मोनाली चव्हाण, ३. स्वाती वटाणे, ट्रिपल जंप: १. स्नेहा मदने, २.  रसिका तारदे, लांब उडी: १. प्रतीक्षा वास्के, २. कोमल जरारे, ३. मोनाली चव्हाण, थाळी फेक: १. गीता वेलनेसकर, २. वैशाली लिंगायत, ३. साक्षी शिंदे. 

(मुले) 100 मीटर धावणे: १. कृष्णा ठोंबरे, २. सम्यक गायकवाड, ३. संजय तादांकर, 200 मीटर धावणे: १. दिग्विजय बैनाडे, २. जीवन तलंकर, ३. चेतन सोमवंशी, 400 मीटर धावणे: १. शुभम दौंड, २. राहुल एम, ३. नरेंद्र गायकवाड, 800 मीटर धावणे: १. भगवान जाधव, २. किशोर कामकहणे, ३. सचिन तायडे, १५०० मीटर धावणे: १. राजू धनावरे, २. हर्षवर्धन छनवाल, ३. दीपक राठोड, ५००० मीटर धावणे: १. अजय राठोड, २. विशाल राठोड, ३. सुनील दळगडे, गोळा फेक: १. ज्ञानेश्वर पधाले, २. आदित्य पवार, ३. आदिनाथ शेंडगे, भालाफेक: १. आदित्य नरवडे, २. तुषार शिंदे, ३. गोपाल इंगळे, थाळी फेक: १. ज्ञानेश्वर बरकुले, २. नरसिंह राजपूत, ३. संदेश मिसाळ
तत्पूर्वी, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे यांच्या हस्ते व उपाध्यक्षा प्राचार्य शशिकला नीलवंत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर बक्षीस वितरण महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य संघटनेचे निरीक्षक राकेश सावे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.रंजन बडवने यांची प्रमुख उपस्थिती होती.  या स्पर्धेत जिल्हाभरातून २१६ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक अधिकारी डॉ.दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल निळे, भरत रेड्डी, पुनम नवगिरे, मुन्ना शेख, रितेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.