वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन साजरा ; जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

वैजापूर ,​१०​ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाचा २४वा वर्धापन दिन शनिवारी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील ठक्कर बाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष अँड. प्रतापराव निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देऊन पक्ष संघटना बळकट करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सारंगधर मोटे, जे.के.जाधव, एराज शेख, महिला आघाडीच्या सुनीता साखरे, अँड.ज्योती शिंदे (कापसे) यांच्यासह पक्षाचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.