वैजापुरात गुरुनानक जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम

वैजापूर, ७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- संपूर्ण देशभरात सर्वधर्मभावाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जात असलेले व मानवतेचे पुजारी गुरू नानकजी यांची 554 वी जयंती साजरी होत आहे. वैजापूर शहरात ही गुरुद्वारात विद्युत रोषणाईने झगमगत असून सोमवारपासूनच गुरुद्वारात भजन, कीर्तन सुरू झालेले आहे.

मंगळवारी (ता.08) सकाळी सहा वाजता गुरू नानकजी यांच्या प्रतिमेची शहराच्या मुख्य रस्त्यावरून-भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर  गुरुद्वारात गुरू नानकजींच्या अमृत वचनाचे  वाचन व लंगर ही देण्यात येणार आहे.

या साठी शहरातील शीख, पंजाबी, सिंधी समुदायांचे नागरिक यांच्या शिवाय दिलजीतसिंग खनिजो, प्रीतीकौर खनिजो, पूर्णिमा भुरारी, पोथीवाल सहकार्य करीत आहेत.