भारतीय संस्कृती व मूल्यांची जपवणूक हीच खरी देशभक्ती – शिवसाधिका साध्वी दुर्गादीदी

गजानन महाराज प्रकटदिन कार्यक्रम

वैजापूर ,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारतीय संस्कृती व नैतिक मूल्ये जगात सर्वश्रेष्ठ व महान असून याचे मनापासून पालन आपल्या कृतीत केल्यास  व आपल्या मुलाबाळांवर हे संस्कार योग्यरित्या बिंबविल्यास आपला देश जगातील सर्व श्रेष्ठ देश ठरेल व महाशक्ती म्हणून गणल्या जाईल असे प्रतिपादन शिवसाधिका साध्वी दुर्गादीदी यांनी शनिवारी (ता.11) येथे श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित त्रिदिवशीय कीर्तन कार्यक्रमात केले. 

त्यांनी महाराष्ट्र राज्याची महिमा ही गायिली तसेच भारतीय महापुरुष व रणरागिणी यांच्या शौर्याची आठवण ही उपस्थितीतांना करून दिली. देशातील माता संस्कृतीच्या उपासक आहेत असेही त्या पुढे म्हणाल्या. याप्रसंगी अजय भुजबळ, सोनाली भुजबळ, श्रावन चौधरी, जयश्री चौधरी व श्याम आगाज यानी दीदींचे पूजन केले. नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण, नगरसेविका शोभाबाई भुजबळ, ज्योती ज्ञानेश्वर टेके, सोनू राजपूत, गौरव दोडे, सुनंदीलाल बोथरा आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्ष काशिनाथ आगाज, उत्सव समिती अध्यक्ष संतोष बोथरा, धोंडीरामसिंह राजपूत, श्याम पवार, गणेश धुमाळ, बाळू पुणे, राजू पुणे, कुणाल जगताप, आदित्य चौधरी, निशिकांत पवार, श्रीवास्तव हे सक्रिय सहभाग नोंदवीत आहे.