सतरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-मिफ्फ 2022 29 मे पासून होणार सुरु

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

मुंबई,२८ मे /प्रतिनिधी :- सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 चे उद्या,म्हणजेच 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजता वरळीतल्या नेहरू केंद्रातील सभागृहात उद्घाटन होणार आहे. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल, या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री, कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड असे मंत्री आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शाजी एन करुण, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा हे या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

सतरावा मिफ्फ अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात, 119 चित्रपट दाखवले जातील, तसेच स्पर्धा क्षेत्रांत, 264 चित्रपट दाखवले जातील. या मिफ्फ मध्येही, विशेष पॅकेजेस, रेट्रोस्पेक्टिव्ह, होमेज, बी-टू-बी, मास्टर क्लासेस यांच्यासह विविध कार्यशाळाही आयोजित केल्या जातील.

बांग्लादेशच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, यंदा बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली आहे. 11 बांग्लादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज, ‘कंट्री ऑफ फोकस’ अंतर्गत मिफ्फ मध्ये दाखवले जाणार आहे. यात, समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट, “ हसीना- ए डॉटर्स टेल’ चित्रपटाचा देखील समावेश आहे. हा चित्रपट बांगलादेशच्या पंतप्रधान आणि मोठ्या राजकीय नेत्या, शेख हसीना, यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.

नेटफ्लिक्सची मूळ मालिका “मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल” च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. 

17 वा मिफ्फ, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरुपात आहे, आणि तो पूर्णपणे मोफत आहे.

यावर्षीचा मिफ्फ पहिल्यांदाच मिश्र स्वरुपात होत आहे. या अंतर्गत चित्रपट रसिकांना स्पर्धा आणि प्रीझम विभागतले चित्रपट प्रतिनिधींना नोंदणी करुन जगभरात कुठेही ऑनलाईन बघता येतील.

शॉर्ट्स टीव्ही ने तयार केलेळे ऑस्कर फिल्म पॅकेज, इटली आणि जपानमधील चित्रपटांचे विशेष पॅकेज, इंडियन पॅनोरामा- यात अलीकडेच झालेल्या इफफीमधील निवड झालेले चित्रपट यांचा समावेश यात होणार आहे. त्याशिवाय, ईशान्य भारतातील चित्रपट, विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट, पॉकेट फिल्म्स मधील सर्वोत्तम लघुपट, तसेच सत्यजित रे यांच्या ‘सुकुमार रे’ ह्या पुनरुज्जीवित चित्रपटाचे विशेष प्रदर्शन देखील या महोत्सवात होणार आहे.

मिफ्फचं देशव्यापी स्वरूप : भारतीय संस्कृतीचा सर्वांग स्वरुप सोहळा

‘कंट्री ऑफ फोकस’

भारत सध्या आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याचवेळी आपले शेजारी राष्ट्र, देखील त्याच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. मुंबईत उद्यापासून सुरु होणाऱ्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ मध्ये याच दोन्ही उत्सवांचे औचित्य साधत, यंदा, बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

बांग्लादेशच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, 11 बांग्लादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज, ‘कंट्री ऑफ फोकस’ अंतर्गत, मिफ्फ मध्ये दाखवले जाणार आहे. यात, समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट, “ हसीना- ए डॉटर्स टेल’( पिपलू खान दिग्दर्शित) चा देखील समावेश आहे. हा चित्रपट बांगलादेशच्या पंतप्रधान आणि जेष्ठ राजकीय नेत्या, शेख हसीना, यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.

त्याशिवाय, कंट्री ऑफ फोकस पॅकेजमधील इतर चित्रपट,बांगला मुक्ती संग्रामाच्या आठवणी ताज्या करणारे आहेत. बांगला भूमी स्वतंत्र करण्यासाठी, तिथल्या लोकांनी दिलेले बलिदान आणि 71 च्या युद्धाच्या आठवणी सांगणारे “ नॉट ए पेनी, नॉट ए गन”, ‘जोलो गुरीला ‘ यांसारखे चित्रपट बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त करणाऱ्या 71 च्या युद्धाची कथा सांगत, बांगलादेशच्या नागरिकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत. स्वातंत्र्यासाठी बांगलादेशच्या नागरिकांनी काय काय छळ आणि हालअपेष्टा सोसल्या, त्या वेदनांना ह्या चित्रपटांनी वाचा फोडली आहे. दिलारा बेगम जॉली यांनी दिग्दर्शित केलेल्या, “जोथोरलिना’ ह्या चित्रपटात, बांग्लादेशी लेखिका, रोमा चौधरी यांनी, युद्धकाळात घालवलेल्या अत्यंत वेदनादायी आणि संघर्षमय आयुष्याची कथा सांगितली आहे. ‘कान पेटे रोई’ या माफिदुल हक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात, 1971 च्या युद्धकाळात झालेल्या अत्याचारांविरोधात खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, एका गणिताच्या प्राध्यापकाची संघर्षमय कथा साकारली आहे.

सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपट, ज्यात, मध्यपूर्वेतून मायदेशी परतेल्या घरगुती कामगारांच्या व्यथा-वेदना, बांग्लादेशमधील महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, अशा विषयांवरील चित्रपटही आहेत. भारतीय चित्रपट संघटनांच्या महासंघाचे उपाध्यक्ष, आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटनांच्या महासंघाचे सचिव (आशिया-पॅसिफिक) प्रेमेंद्र मजुमदार यांनी या विभागासाठीच्या चित्रपटांची निवड केली आहे.

‘‘कंट्री ऑफ फोकस’ मधील चित्रपटांकडे नजर टाकूया:

निशब्दोतर शोहोर (शांतता )

दिग्दर्शक : अमिताभ रझा चौधुरी

प्रकार : लघुपट

कालावधी : 12 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 31 मे, 2022(6 pm to 8 pm)

रिपल्स

दिग्दर्शक : सुबरणा सेनजुती तुशी

प्रकार : लघुपट

कालावधी : 45 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 03, जून , 2022 (6 pm to 8 pm)

नॉट ए पेनीनॉट ए गन

दिग्दर्शक : मकबुल चौधुरी

प्रकार : माहितीपट

कालावधी : 40 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ: जून 02,2022 (6pm to 8 pm)

जोथोरलिना

दिग्दर्शक : दिलरा बेगम जॉली

प्रकार : चरित्र पट

कालावधी : 40 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ: 01 जून, 2022 (3.45 pm to 5.45 pm)

हसीना- ए डॉटर्स टेल

दिग्दर्शक : दिलरा बेगम जॉली

प्रकार : चरित्र पट

दिग्दर्शक: पिपलू खान

प्रकार: माहितीपट

कालावधी : 70 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : जून 02,2022 (6pm to 8 pm)

बगानिया (स्मृति बाग )

दिग्दर्शक: हुमाइरा बिलकीस

प्रकार: माहितीपट

कालावधी : 55 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 30 मे, 2022 ( 6 pm to 8 pm )

दोजाहान (त्यांच्या कथात्यांची सत्ये)

दिग्दर्शक: रतन पॉल

प्रकार: माहिती कथापट

कालावधी : 73.10 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 31 मे ,2022 (6 pm to 8 pm)

जोन्मशथी (एकत्र जन्म )

दिग्दर्शक: शबनम फिरदौसी

प्रकार: माहितीपट

कालावधी : 72 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 01 जून 2022 (3.45 pm to 5.45 pm)

आराइमोन शोप्नो

दिग्दर्शक: अबू रशीद एमोन

प्रकार: लघुपट 

कालावधी : ३५ मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ 30 मे , 2022 (6 pm to 8 pm)

कान पीते रोई

दिग्दर्शक: मोइदुल हक़

प्रकार: माहितीपट

कालावधी : 35 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 03, जून 2022 (6 pm to 8 pm)

जोलो गुरिला

दिग्दर्शक: सुमन देलोवर

प्रकार: लघुपट

कालावधी : 48 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 03, जून , 2022 (6 pm to 8 pm)