पुस्तक संग्रह करून परिपूर्ण वाचन करणे ही सर्वश्रेष्ठ संपत्ती -माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर

वैजापूर,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :-
पुस्तक संग्रह करून त्यांचे परिपूर्ण वाचन करणे ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती होय असे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी येथील  विनायकराव पाटील महाविद्यालयात आयोजित पुस्तक वाटप कार्यक्रम प्रसंगी केले. 

मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या स्थानिक निधीतून मराठवाड्यातील 3,340 शाळांना पुस्तकांचे करण्यात येणार आहे.याचाच एक भाग म्हणून वैजापूर तालुक्यातील शाळांना ही पुस्तके माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याहस्ते आज वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश पाटील बोरणारे  होते.महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिला उपाध्यक्ष विशाल शेळके, तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव थोरे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, मंजाहरी पाटील गाढे, प्रशांत शिंदे, दिलीप बोरणारे, प्रेमसिंह राजपूत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
11 कोटींची अकरा लाख पुस्तके वाटपाचा हा व्यापक व मोठा कार्यक्रम आहे.तालुक्यातील शाळा प्रमुखांना बोलावून ही पुस्तके त्यांना वाटप करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.