पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा 16 एप्रिलला

3 हजार 120 उमेदवारांना प्रवेश, तीनशे 18 अधिकारी, कर्मचारी नियुक्त

औरंगाबाद ,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण नऊ परीक्षा उपकेंद्रावर 16 एप्रिलला सकाळी 11 ते 12 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत  परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी  3 हजार 120 उमेदवारांना प्रवेश आहे. परीक्षेसाठी  तीनशे 18 अधिकारी,  कर्मचाऱ्यां ची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र, स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

—————————————————–

परीक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना कोविड 19 विषाणूच्या अनुषंगाने अतिरिक्त संरक्षणात्मक किट परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकरीता मुलभूत कोविड किट  व फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरीता वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे किट आयोगा मार्फत पुरविण्यात येणार आहे.परीक्षेच्या  पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.

—————————————————————————————————

उमेदवारांना परीक्षा हॉल मध्ये आयोगाच्या वेबसाईटवरुन प्राप्त केलेले प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखीचा मुळ पुरावा व त्याची झेरॉक्स प्रत,पारदर्शक पाण्याची बॉटल व सॅनिटायझर बॅटल  या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य, वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन 

उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा 

केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास 

उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल.