वैजापूर शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा

वैजापूर,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-शहरातील करुणा माता चर्च येथे ख्रिसमस सणानिमित्त प्रभू येशू ख्रिस्त यांच्या स्मृतींना रविवारी (ता.25) अभिवादन करण्यात आले. विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते.  व्याखान, प्रभू येशूची गीते, महाप्रसाद, प्रभू येशूची प्रतिज्ञा असे विविध कार्यक्रम आयोजित करून चर्चवर सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  या दरम्यान मायकल डिसुझा यांनी चर्च मध्ये जमलेल्या बंधू भगिनींना प्रभू येशूचा संदेश वाचून दाखविला. जगाच्या कल्याणासाठी गोरगरीब दीन दुबळ्याच्या सेवेत स्वतःला गुंतवा, स्वतः सुखी व आनंदी रहा इतरांना ही सुखी व आनंदी ठेवा असा उपदेश त्यांनी दिला. फादर संजय ब्राह्मणे, फादर प्रवीण जाधव यांनी प्रभू येशूची

शिकवण अंगी बानवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा असे विशद केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपुत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सर्व उपस्थित बंधुभागिनींना ख्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या. दिनेश राजपूत, राजेश गायकवाड,  दुशिंग सर व तालुक्यातील बंधू भगिनी उपस्थित होते.दुर्गावाडी येथील चर्च मध्येही नाताळ उत्सव उत्साहात झाला.