वैजापुरात धम्म दीक्षा परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वैजापूर,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे 1935 साली धर्मांतर घोषणा केली होती त्या घटनेला आज गुरुवारी (ता.13) रोजी 87 वर्षे झाली त्याप्रित्यर्थ  वैजापूर येथे नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, नगरसेवक राजेश गायकवाड, शिक्षण सभापती दशरथ बनकर, विजय बाबा त्रिभुवन व सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

औरंगाबाद व गंगापूर येथील महिला येवला येथे जाताना थांबून त्यांनीही डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या समयी विजय बाबा त्रिभुवन यांनी फळ वाटप केले. अन्नदान कार्यक्रम   ही ठेवण्यात आला होता. बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व  बंधू-भगिनींनी  ₹फळ वाटप व अन्नाची पाकीट देण्यात आली. याप्रसंगी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, कैलास पगारे,सुनील पवार, सूत्रसंचलन  धोंडीराम राजपूत यांनी केले तर आभार राजेश गायकवाड यांनी मानले.