वैजापूर- गंगापूर रस्त्यावर ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक ; भीषण अपघात तीन मजूर ठार तर एक जखमी

Displaying IMG-20220318-WA0149.jpg

वैजापूर,१८ मार्च  /प्रतिनिधी :- ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार तर एक जखमी झाला. वैजापूर-गंगापूर रस्त्यावर वरखेड पाटी जवळ रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.

Displaying IMG-20220318-WA0143.jpg


वैजापूरकडे जाणारा ऊसाचा ट्रक (एम.एच.18, 2737) आणि समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन (एम.एच.13, सीयू- 1500) या दोन्ही वाहनांची वैजापूर – गंगापूर रस्त्यावर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात पिकअप व्हॅन चा चुराडा होऊन त्यामध्ये प्रवास करणारे अरविंद सुरवसे (वय 28 वर्ष, रा.सोलापूर), अक्षय क्षिरसागर (वय 30 वर्ष, रा.सोलापूर) व गणेश शिरसाठ (वय 30 वर्ष,रा.अहमदनगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर शिवशंकर संघवी (रा.चाकूर, जिल्हा-लातूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

Displaying IMG-20220318-WA0144.jpg

अपघातस्थळी पोहचलेल्या डॉ. प्रशांत पांढुरे, डॉ. नितीन वालतुरे, सुराशे, अजीम पटेल व अनंता कुमावत यांनी मदतकार्य केले.पिकअप व्हॅन मधील मृत व जखमी मजुरांना त्यांनी बाहेर काढले.