वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड ;अध्यक्षपदी डॉ. सुभाष भोपळे

वैजापूर, २५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापुर तालुक्यातील खासगी डॉक्टरांची आज बैठक होऊन वैजापूर डॉक्टर्स असोसिएशन (VDA) या नावाने डॉक्टरांची एकच संघटना स्थापन करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष भोपळे यांची निवड करण्यात आली.

डॉक्टर्स असोसिएशनची निवडण्यात आलेली नवनिर्वाचित कार्यकारणी अशी. अध्यक्ष – डॉ सुभाष भोपळे, उपाध्यक्ष – डॉ गणेश अग्रवाल, डॉ धनंजय महाडीक, डॉ दिनेश राजपूत, सचिव – डॉ योगेश राजपूत, सहसचिव- डॉ संदिप म्हस्के, कोषाध्यक्ष – डॉ पंकज संचेती, सहकोषाध्यक्ष- डॉ धरमचंद जैन,

कार्यकारिणी सदस्य – डॉ चैतन्य तांबे, डॉ नीलेश कदम, डॉ गणेश जगताप, डॉ. बी. बी. शिंदे, डॉ. महावीर संघवी, डॉ नितेश शाह, डॉ. राजीव मतसागर,डॉ. जी. बी. जाधव, डॉ. श्रेयश पाटील, डॉ दर्शन शर्मा,डॉ. अजीम पठाण, महिला प्रतिनिधी -डॉ. प्रतिमा उद्धव सोनवणे, डॉ. प्रीती परेश भोपळे