नांदगाव-तलवाडा-शिऊर बंगला रस्त्याच्या कामाचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन ; रस्ता दुरुस्तीसाठी 6 कोटी 50 लक्ष निधी मंजूर

वैजापूर,७ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यशासन अर्थसंकल्प 2020-21 शिर्षकाअंतर्गत अहवा-मालेगाव-नांदगाव-तलवाडा-शिवूर बंगला (रा.मा. 26 शिवूर बंगला ते तलवाडा वैजापुर हद्द) या 9 कि.मी.रस्ता दुरुस्तीसाठी 6 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्ता दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते गुरुवारी (ता.7) तालुक्यातील शिऊर बंगला येथे झाला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, बाजार समितीचे सभापती भागीनाथ पाटील मगर,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव, खरेदी -विक्री संघाचे सभापती साहेबराव पाटील औताडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे, उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघ, गोरख पाटील आहेर, गोकुळ आहेर, उपसभापती राजेंद्र चव्हाण, आनंद निकम , शाखा अभियंता श्रीमती राठोड  यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी भाषणे झाली. शासनाच्या विविध योजनामधून तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 250 कोटींच्यावर निधी मंजूर करून आणला असून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आ. बोरणारे यावेळी म्हणाले.या कार्यक्रमास विभागप्रमुख भिकन सोमासे, अरूण होले, उपविभागप्रमुख संतोष दौंगे, अंबादास  खोसे, अरुण मगर, चांगदेव जाधव, गुलाबराव पवार, शासकीय गुत्तेदार प्रविण ठोंबरे, सरपंच नवनाथ राऊत, सुभाष कदम, संजय पवार, महेश बोर्डे, अनिल कुळधर, चंद्रकांत पवार, भरत साळुंके, राधाकृष्ण भागवत, पिंटूकाका तुपे, भाऊसाहेब निकम, राजेंद्र  जाधव, बाळनाथ मुळे, बाळासाहेब जाधव, संजय  कुंदे, सुनिल शेळके, सुदाम गोरे, प्रभाकर मते, संदिप  पवार, नरेंद्र सरोवर, नवनाथ कदम, कैलास कदम, दिपकभाऊ वाघ, बाबासाहेब  राऊत, विजय जाधव, राजू राऊत, समाधान सुर्यवंशी, रावसाहेब सुर्यवंशी, दादाभाऊ मगर, विवेक जाधव, विजय मगर, आत्माराम गायकवाड, भावराव पवार, बी.के.पाटील, विकास फुलारे, वाल्मिक शेजुळ, भरत गायके, गुडु फिटर, गणेश कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.