चोरवाघलगाव येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास पकडले ; देशी दारूचे आठ खोके जप्त ; विरगाव पोलिसांची कारवाई

वैजापूर, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-तालुक्यातील विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलंलेल्या चोर वाघलगाव शिवारात हॉटेलच्या मोकळ्या जागेत विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून 364  देशी दारूच्या बाटल्यांचे आठ खोके व सात विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. View Post

देशी दारूची किंमत सुमारे 25 हजार 480 रुपये आहे तर  विदेशी दारूची किंमत 910 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ सोपान पवार (19) रा. काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खोकड, पोलीस नाईक गोलवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.