आमदार अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

औरंगाबाद,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा सायकल संघटना व शैलेश पाटणी मित्र मंडळातर्फे आमदार अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

May be an image of 7 people, people sitting, people standing and road

या सायकल रॅलीचा मार्ग संस्थान गणपती, राजाबाजार, महात्मा गांधी पुतळा, सिटी चौक, क्रांतीचौक, सायकल ट्रॅक असा होता. सायकल रॅलीचे उद्घाटन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीचे सूत्र संचालन निखिल कचेश्वर यांनी केले. सर्व सायकलपटूंना पदक व प्रमाणपत्रांचे वितरण आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपचे पदाधिकारी अनिल मकरिये  उपस्थित होते. 

May be an image of 2 people, people standing, bicycle and outdoors


या सायकल रॅलीमध्ये संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजितसिंग संघा, अमोघ जैन, मनीष खंडेलवाल, राजकुमार मलानी, सोनम शर्मा, अॅड. निनाद खोचे, बाबासाहेब सूर्यवंशी, चेतन मालानी, संकेत गुप्ता, ऋषिकेश रैला, चैतन्य पल्लवे, सिद्धेश पणजकर, आशिष अस्वार, सरबज्योतसिंग कोहली, प्रा. चांगदेव माने, मोहन उन्हाळे, राजेश वानारे, हरिश्चंद्र मात्रे, सतीश अन्वेकर, पद्मावती धारवाडकर, दत्तात्रय महाजन, गणेश काशीद, शंकर काकडे, वृंदा काकडे, पद्मराज रामीनवार, उदय बाहेती, अनिकेत धूत, पायस औटी, डॉ. सुनील देशमुख, शरद गोयल, डॉ. प्रफुल्ल जटाळे, अजय पांडे, सचिन कासलीवाल, विशाल आढावे, कार्तिक आढावे, राजेंद्र भगत, संजय जाधव, शिवानी जाधव, अनिल सुलाखे, मानवेंद्र सिंग, सचिन कदम, संतोष बेडके, गणेश गंधम, मोहित मारवाह, स्वप्नील दुर्गुडे, ओंकार राऊत यांनी सहभाग नोंदविला.