कर्मचाऱ्यांनी कर्तव्य भावनेने काम करावे-माहिती संचालक राधाकृष्ण मुळी

Displaying WhatsApp Image 2021-05-31 at 4.47.41 PM.jpeg

                             

औरंगाबाद,३१ मे /प्रतिनिधी:- नोकरीत कार्यरत असताना कर्मचाऱ्यांनी कर्तव्य भावनेने काम करावे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती), राधाकृष्ण मुळी यांनी केले.

नियत वयोमानानुसार श्री.मुळी दि.31  मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव, व श्याम टरके, प्रतिवेदक रेखा पालवे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Displaying WhatsApp Image 2021-05-31 at 6.23.10 PM.jpeg

आपल्या सेवेच्या 26 वर्षाच्या कार्यकाळात निष्ठेने कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान लाभल्याचे सांगून श्री.मुळी यांनी नोकरीच्या कालावधीत आलेले अनुभव यावेळी विशद केले. ते म्हणाले की मनात कोणत्याही प्रकाराची भिती न बाळगता कर्मचाऱ्यांनी सचोटी व प्रामाणिकपणे काम करावे. तसेच नवनवीन गोष्टी आत्मसात करुन आपल्या कामामध्ये सुधारणा कराव्यात. वृत्तविषयक बाबींसाठी विविध अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आपल्या अनुभवात भर घालावी. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न ठेवता आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन संघ भावनेने काम करावे.

श्री. चिलवंत यांनी आपल्या मनोगतात श्री.मुळी यांच्या कार्याचा यथोचित गौरव  करुन यापुढेही सरांचे मार्गदर्शन लाभत राहो,  अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक श्री.धोंगडे यांनी केले. यावेळी श्रीमती ढास, श्रीमती जाधव, श्री. टरके, श्री.म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले. तर श्रीमती थोरात यांनी आभार मानले.