केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग ; केंद्रातील भाजप सरकार विरोधात महाविकास आघाडीतर्फे वैजापुरात निदर्शने आंदोलन

वैजापूर ,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक त्याचप्रमाणे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केंद्र सरकारकडून होत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शहरातील ठक्कर बाजार परिसरात आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, बाळासाहेब संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे कशिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, रामहरीबापू जाधव, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाष पाटील तांबे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शहराध्यक्ष मलिक काझी, बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, सौदागर, खुशालसिंग राजपूत, बाळासाहेब जाधव, नगरसेवक प्रकाश चव्हाण, स्वप्नील जेजुरकर, डॉ. निलेश भाटिया, डॉ. संतोष गंगवाल, ज्ञानेश्वर टेके, कल्याण जगताप, अशोक हाडोळे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष लता पगारे, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, युवासेनेचे अमीर अली, श्रीकांत साळुंके, सलीम वैजापुरी, खलील मिस्तरी, आवेज खान, बळीराम राजपूत, साहेबराव औताडे,रावसाहेब मोटे, खंडू पाटील गाढे, गोटूसिंग राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या निदर्शने आंदोलनात सहभागी झाले होते.