औरंगाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे १८ फेब्रुवारी रोजी अनावरण रात्री बारा वाजता

औरंगाबाद,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (ऑनलाइन) उपस्थित राहणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवप्रेमी, नागरिक व जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे.