औरंगाबादेत २१४ नवे कोरोनाबाधित,सात बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद:जिल्ह्यात सोमवारी (२७ जुलै) दिवसभरात २१४ बाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३,२५२ झाली आहे. त्यापैकी ८९५३ बाधित हे आतापर्यंत करोनामुक्त झाले. तर, आतापर्यंत ४४९ बाधितांचा मृत्यू झाला आहे व सध्या ३८५० बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये गारखेडा येथील १, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पडेगाव २, राम नगर १, एसटी कॉलनी २, पंचशील नगर २, नारेगाव २, किर्ती सोसायटी, एन-आठ १, ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा १, मुकुंदवाडी ६, जयभवानी नगर २, एन-दोन सिडको १, ग्लोरिया सिटी, पडेगाव १ येथील व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये संतपूर, कन्नड येथील १, पाचोड १, बजाज नगर १, औरंगाबाद तालुका १०, सिल्लोड ६, वैजापूर २१, पैठण १, फुलंब्री १, गंगापूर २९, खुलताबाद १४, सिल्लोड २, वैजापूर २१, पैठण ४, बजाज नगर १, तर रांजणगाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवरील बाधित

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३०, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाच्या तपासणीत ४६, तर ग्रामीण भागात ६९ बाधित आढळून आले आहेत. सिटी एंट्री पॉईंटवरील बाधितांमध्ये राम नगर येथील १, जयभवानी नगर १, सातारा परिसर १, सिडको महानगर १, उस्मानपुरा १, एन-सात १, रांजणगाव १, कन्नड १, सिल्लोड १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, जाधववाडी १, पुष्पक गार्डन, चौधरी कॉलनी, चिकलठाणा ५, भावसिंगपुरा २, चित्तेगाव ३, तीस ग्रीन स्कीम पैठण रोड १, तापडिया प्राईड २, समर्थ नगर १, छावणी १, शेंद्रा एमआयडीसी १ व इतर ठिकाणच्या तिघांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ४० ते ७० वयोगटातील सहा, तर बीड जिल्ह्यातील खामखेड येथील ६५ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) तसेच खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ४४९ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात सोमवारी (२७ जुलै) दुपारपर्यंत करोनाबाधितांची संख्या १३,१०५ झाली आहे.  

सिल्कमिल कॉलनीतील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला १३ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा रविवारी (२६ जुलै) दुपारी अडीच वाजता मृत्यू झाला. बीड येथील खामखेड येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला २४ जुलै रोजी घाटीत दाखल केले व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टनुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी सायंकाळी सव्वापाचला मृत्यू झाला. जटवाडा परिसरातील राहत पटी तांडा येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला १७ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रविवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला. पुंडलिक नगर (गल्ली क्रमांक ७) येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाला १७ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी मध्यरात्री पावणे तीन वाजता मृत्यू झाला. भावसिंगपुरा येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला १९ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी पहाटे पावणे पाच वाजता मृत्यू झाला. जयभवानी नगर येथील ७० वर्षीय महिला रुग्णाला १८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रविवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. त्याचवेळी सिल्लोडमधील डॉ. झाकीर हुसेन नगरातील ५० वर्षीय करोनाबाधित पुरूष रुग्णाचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीमध्ये ३४२, तर जिल्ह्यात ४४९ बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *