“शिवजागर” महोत्सवाची ध्वजारोहणाने जल्लोषात सुरुवात

औरंगाबाद,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने “शिवजागर” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि.१५ ) या महोत्सवाची मुख्य सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तदनंतर महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे ,उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोगरे ,उपजिल्हाप्रमुख अनील पोलकर ,शहरप्रमुख बाळासाहेब थोरात ,विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक राजु वैद्य,गोपाल कुलकर्णी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून जल्लोषात सुरुवात करण्यात आली. ढोल – ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान वाद्य पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी राजेंद्र दानवे, राजू खरे, सतीश कटकटे,रणजीत दाभाडे, प्राध्यापक संतोष बोर्डे ,संजय जाधव, विजय यादव सुनील शिंदे, सुरेश आठवले ,संदीप मस्के, विकास राठोड ,संतोष जाधव, विकास शिंदे, विशाल म्हात्रे, नितेश मुंदावणे, बाळू गायकवाड, नितीन पवार, विश्वनाथ राजपूत अभिजीत पगारे महिला आघाडीच्या शहर संघटक आशा दातार, उपशहर संघटक कविता सुरळे, शोभा बडे, सुनिता सोनवणे, सुषमा यादगिरे, तृप्ती पवार ,कांता गाढे आदींसह शिवसैनिक , शिवभक्त उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “संभाजी महाराज की जय” जयघोषाने शहर दणाणले

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित “शिवजागर महोत्सवाची” आज उत्साहात सुरुवात करण्यात आली. शिवजागर महोत्सवाअंतर्गत पूर्व – पश्चिम – मध्य शहरात उपशहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवमशाल रथयात्रा काढण्यात आली. वार्डा वार्डात या जल्लोषात मशाल यात्रेची मिरवणूक काढण्यात आली. ठीकठिकाणी नागरिकांनी मशाल यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” , “छत्रपती संभाजी महाराज की जय” या जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले मशाल यात्रेमुळे शहरात भगवे चैतन्य निर्माण झाले असून शिवप्रेमीं ही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.

एकतानगर – हर्सूल भागात मोठ्या उत्साहात मशाल यात्रा

शिवसेना उपशहरप्रमुख संजय हरणे उपजिल्हा संघटक मीनाताई फासाटे यांच्या नेतृत्वाखाली हर्सूल, एकता नगर, होनाजी नगर ,सारा वैभव, कोळीवाडा, चेतना नगर, मयुर पार्क, या भागात रथ मशाल यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली याप्रसंगी रूपचंद वाघमारे, सोमनाथ गुंजाळ, बन्सी मामा जाधव, सुरेश फसाटे, तुळशीराम बकले ,नागेश थोरात, विजय तांदळे, रघुनाथ हरणे, देवा भगुरे ,निलेश कुटे, संदीप ओताडे, किशोर ठाकरे, संदीप चव्हाण, रमेश सूर्यवंशी, राहुल कुटे, रोहित शेलार, उमेश साबळे, अशोक पालवे, देविदास तुपे, रामदास पवार, बाबा गायकवाड, संतोष सूर्यवंशी, साहिल जाधव, विकी बकले, खुशाल भोसले, बाबा हरणे, सुभाष वाघमारे, दत्ता गोविंदे ,रंगनाथ हरणे, प्रकाश वाणी, निंबाळकर भैय्या, राजेंद्र शेजवळ, शिवाजी शिरसाट, अक्षय गांगुर्डे, जगदीश तुपे, निलेश काथार, शब्बीर बेग, गफुर शेख,फैज खान, महिला आघाडीच्या शारदा घुले ,संध्या जाधव, जया पाटील, पुष्पा नलावडे, वैशालीताई पाटील, प्रतिभा राजपूत, जयमाला दुर्वे, सोनाली गायकवाड, लताताई शेटे, मिटकर ताई, वाघ ताई आदींची उपस्थिती होती.

“शिवजागर” महोत्सवानिमित्त शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने मशाल रथ यात्रा

“शिवजागर” महोत्सवानिमित्त शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवमशाल यात्रा काढण्यात आली. या मशाल यात्रेची सुरवात कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणाहून करण्यात आली ही मशालयात्रा रेल्वे स्टेशन कॉर्टर, छावणी, असिफिया कॉलनी, लेबर कॉलोनी, चंपा चौक , नवाबपूरा या प्रभागातून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” जयघोष करत क्रांतीचौक या ठिकाणी समारोप करण्यात आला यावेळी अल्पसंख्याक आघाड़ी महाराष्ट्र जिल्हा संघटक समीर जावेद कुरैशी , शेख रब्बानी यांच्या नेतृत्वाखाली ही मशाल यात्रा काढण्यात आली यावेळी पश्चिम शहरसंघटक अब्दुल रहीम,उपसंघटक शेख हमिद,अनवर फारूकी,उपसंघटक अब्दुल गफूर, युवा सेना सागर वाघचौरे ,अफसर कुरैशी, अथार खान, सय्यद ईमरान, सय्यद जफर अली, रहीम पठान, परवेज खान, महोमाद गालीब (गुडू) , अब्दुल फहीम ,अजमत उला, नवाज खान , शकील शेख, अफरोज शेख, मस्तक शेख, रिजवान खान , अकील कुरैशी,समीर शेख,इरशाद पठान , मूसा कादर आदींचा सहभाग होता. छावणी विभागात उपशहरप्रमुख किशोर कछवाह यांनी मशाल यात्रेचे धुमधडाक्यात स्वागत केले .

मुकुंदवाडी ,रामनगर, ठाकरे नगर भागात जल्लोषात मशाल रथयात्रा

“शिवजागर” महोत्सवाअंतर्गत मोठ्या जल्लोषात मुकुंदवाडी रामनगर भागात शिव मशाल यात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या उत्साहात या यात्रेचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब डांगे माजी महापौर सुनंदाताई कोल्हे, नगरसेवक कमलाकर जगताप, मनोज गांगावे,दामू अण्णा शिंदे शिवसेना उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे युवासेना जिल्हा अधिकारी हनुमान शिंदे,अवधूत अंधारे, मनोज बोरा, विभागप्रमुख लक्ष्मण पिवळ, भाऊसाहेब राते, विष्णु गुंठाळ,रुपेश मालाणी,भगवान कोकाटे,नारायण बरकासे,रामेश्वर कोरडे,ज्ञानेश्वर लामदांडे,दीपक जाधव,शिवा रोकडे, प्रशांत कुऱ्हे,सचिन वाघ,सुरेश प्रशाद,सतीश वाघ,योगेश जगताप, दत्ता जाधव,शुभम वाघ,ज्ञानेश्वर कुबेर,काशिनाथ वाघ महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक दुर्गा भाटी, भागुबाई सिरसाठ,रेखा शहा,गौराबाई जाटवे,नंदा कळवणे,
सदाशिव पापुलवाड,मोहन गावंडे,भागवत भारती,महादेव कोल्हे,विजय गावडे,संभाजी डांगे,राहुल सिरसाठ,गजानन नगरे,सागर चौरे,दत्ता कणसे,पंकज भावे,रोहित सोनवणे,ज्ञानेश्वर नवपुते,शरद कदम,बाळू रिठे,गणेश चौरे,अरुण ससाणे ,अमोल संसने आरती सलुके,दोरका नाराळे,लता जैन आदी शिवप्रेमी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पडेगाव मिटमिटा भावसिंगपुरा भागात शिव मशाल यात्रा

शिवजागर महोत्सवानिमित्त आज पडेगाव मिटमिटा भावसिंगपुरा भागात मशाल यात्रा काढण्यात आली याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख श्री अंबादास अण्णा म्हस्के माजी नगरसेवक हिरालाल वाणी सुभाष शेजवळ शिवसेना विभाग प्रमुख गणेश लोखंडे शाखा प्रमुख प्रकाश दुबिले राहुल यादी जयद्रथ लोखंडे विनोद लोखंडे उपशाखाप्रमुख किसन कनसे बापू आढाव हरीश दुबिले खंडू म्हस्के उपविभाग अमोल मुळे संजय यादव ज्ञानेश्वर आढाव विलास सोनवणे युवा सेनेचे सुहास ठोंबरे अक्षय जाधव राजेश जाधव सोनू साबळे ज्ञानेश्वर शिंदे प्रविण शिंदे आदींची उपस्थिती होती.