विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला,भाजपच्या कार्यकर्त्याविरूध्द गुन्हा

जालना ,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जालना तालुक्यातील सेवली या गावात सोमवारी रात्री विनापरवानगी छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांच्या सोबत काही कार्यकर्त्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आज अनेक युद्ध आणि यापूर्वीची महायुद्ध लढली गेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श  आज महाराष्ट्रातील सर्व तरुणाई समोर आहे  असे असताना अनेकांना प्रेरणा मिळावी अशा उद्देशाने महाराष्ट्रभर अनेक पुतळे उभे केले जातात तसा स्थानिक तरुणांनी सेवली तालुका जालना या ठिकाणी पुतळा उभारला असून हा पुतळा हटवण्याचा महापाप राज्य सरकारने करू नये अन्यथा याचा गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील या शब्दांत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात  मुस्लिम सरदार होते त्यांचे वकील , अंगरक्षक  ते  आग्र्याच्या सुटकेत  अनेक ठिकाणी मुस्लिम मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकदा साथ दिली आहे हा इतिहास प्रत्येकाच्या मनात कोरला गेलेला असून पुतळा हटवण्याचे महापाप सरकारने केल्यास दोन्ही धर्मांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन शांतता व कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असून महाराजांचा पुतळा कदापी  हटवला जाणार नाही अशी आमची रोखठोक भूमिका आहे असे लोणीकर यांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजीमहाराजाच्या पुतळ्याच्या रक्षणार्थ कोणत्याही परिणामाची चिंता आम्हाला नाही असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.
हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि इतर बाबी स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा हा आमचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय  आहे प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळा आहे त्या ठिकाणी पुतळा राहावा यासाठी सेवली गावातील प्रत्येक नागरिक प्रयत्नशील आहेत जर पुतळा हटवला तर शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी गावपातळीवर कोणत्याही प्रकारचे कोणत्याच समाजात मतभेद नसून सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे समर्थक आहेत  आज हा पुतळा ज्या जागेवर ठेवण्यासाठी आग्रही आहोत असे असताना प्रशासनाने त्यात अधिकचा हस्तक्षेप करू नये असे  लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत काही ठिकाणावर तर स्थानिक लोकांचा देखील विरोध आहे परंतु तरी देखील ते सर्व पुतळे आजही दिमाखात उभे आहेत मात्र सेवली गावातील सर्व गावकऱ्यांची सहमती असताना  हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्यास संपूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन केले जाईल तसेच विधानसभेमध्ये देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला जाईल परिणामी प्रशासनाने जनतेच्या मना विरुद्ध वागण्याचा प्रशासनाने प्रयत्न करू नये केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला  अशांततेला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असा इशारा  यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वसमावेशक त्यामुळे आमची भूमिका “सबका साथ सबका विकास” – राहुल लोणीकर
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासाचा प्रयत्न करणारे होते सर्वसमावेशक स्वरूपाचा विचार त्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला आणि तो आदर्श घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हीच भूमिका आमची असून कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा बिघडणार नाही शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही अशी सर्वांची भूमिका आहे त्यामुळे प्रशासनाने सहकार्य करावे व पुतळ्याला अधिकृत परवानगी मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत करावी अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली  श्री राहुल लोणीकर यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सरपंच शेख नवीद ग्रामपंचायत सदस्य अजीम पटेल यांच्या हस्ते नारळ फोडून पुतळ्यासाठी अधिकृतपणे सर्व ग्रामस्थ सहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव प्रकाश टकले विकास पालवे डॉ.शरद पालवे दिलीप जोशी कोमल कुचेरया शिवराज तळेकर समाधान वाघमारे प्रमोद भालेकर गजानन महाजन सौरभ माहुरकर शेख नवीद अजीम पटेल मुन्ना पटेल फरहान अन्सारी विठ्ठल मोरे बाबु शिंदे गणेश मोरे रामेश्वर काकडे दिलीप बानाईत अच्युत अंभोरे माऊली क्षीरसागर विक्रम उफाड गजानन उफाड राजू पवार विनोद राठोड जालिंदर राठोड रामदास ढाकणे यांच्यासह माता-भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती