वेरुळ लेणी परिसरातील ‘भगवान महावीर किर्ती स्तंभ“ हटविण्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा; नसता मुक मोर्चा

सकल जैन समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालना,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वेरुळ लेणी परिसरामधील भगवान महावीर यांचे किर्ती स्तंभ हटविण्याबाबतचे वृत्त सकल जैन समाजाला धक्का देणारे असून याचा सकल जैन समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत   आहे. ‘भगवान महावीर किर्ती स्तंभ“ हटविण्याबाबतचा निर्णय परत घ्यावा. नसता सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.  
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेरुळ लेणी परिसरामधील भगवान महावीर यांचे किर्ती स्तंभ हटविण्याबाबतची बातमी सकल जैन समाजाला धक्का देणारी असून वास्तवीक पाहता भारतीय संविधानामध्ये समता, बंधुता, समभाव या तत्वाला मोठे स्थान आहे आणि भारतामध्ये सर्व धर्माला संस्कृतीला आदर आहे. त्यानुसार सन 1974 मध्ये भगवान महावीर यांच्या 2500 वे महानिर्वाण निमीत्ताने भगवान महावीर यांच्या सत्य, अहिंसा, प्रेम व जगा व जगु दया या तत्वांचा संदेश भगवान महावीरांनी सर्व समाजामध्ये पसरविण्याचे कार्य केले असल्याने त्यांचा नावाने वरील ठिकाणी “भगवान महावीर किर्ती स्तंभ केंद्र शासनाच्या व पुरातत्व विभाग व संस्कृतीक विभाग मंत्रालय यांच्या परवानगीने उभारण्यात आला होता. तेव्हा पासुन आज लगभग 48 वर्षे पूर्ण झालेले आहेत. तसेच हा “भगवान महावीर किर्ती स्तंभ“ जन सामान्याच्या मनात भगवान महावीर यांचे विचारातुन आदर्श घेत बांधलेला असुन या स्तंभाच्या माध्यमातुन एकता व सदाचाराचे जिवन जगता यावे असा संदेश भारतीय व विदेशी पर्यटकांना भगवान महावीर यांच्या तत्वाचे दर्शन घडविते व त्यांच्या पासुन बोध घेऊन हे पर्यटक आपल्या दैनदिन जिवनात उतरविण्याचा व आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून त्यांचे जिवन हे वाईट कृत्यापासुन, व्यसना पासुन अलिप्त होण्यास मदत होते.

समस्त मानवी जिवनाला वळण देणाऱ्या व भगवान महावीर यांच्या सत्य, अहिंसा, प्रेम, व जगा व जगु दया या तत्वांचा संदेश देणाऱ्या “भगवान महावीर किर्ती स्तंभ“ ला न हटविता तेथेच राहु दयावे व सकल जैन समाजाच्या भावना दुखविण्याचे कार्य करु नये असे झाल्यास सकल जैन समाज एकत्र येऊन अहिंसक मार्गाने निषेध आंदोलन करतील व या आंदोलनाचे पडसाड़ संपुर्ण देशामध्ये उमटतील. सकल जैन समजाच्या श्रध्दा व भावनांना समजून घ्यावे. व “भगवान महावीर किर्ती स्तंभ“ हटविण्याबाबतचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा नसता सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  देखील निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर ॲड. ऋषभचंद माद्रप, धनराज जैन, महेंद्र सावजी, संजय लव्हाडे, मयुर सावजी, विपीन सावजी, नरेंद्र सावजी, आशिष जैन, अक्षय सावजी, प्रविण जैन, सुभाष वायकोस, ब्रिजलाल जैन, रमेश संघवी, प्रेमचंद कासलिवाल, सोमेश ठोले, सुभाष वायकोस, सुर्यकांत धोंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.