राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के

६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
Image

मुंबई, दि.२५: राज्यात आज ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार  ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार  ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७०,८७८), बरे झालेले रुग्ण- (३९,१४९), मृत्यू- (४०६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,६५९)

ठाणे: बाधित रुग्ण- (२९,४८८), बरे झालेले रुग्ण- (१२,४२४), मृत्यू- (८१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,२५३)

पालघर: बाधित रुग्ण- (४२६३), बरे झालेले रुग्ण- (११८८), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९७६)

रायगड: बाधित रुग्ण- (३०८५), बरे झालेले रुग्ण- (१८२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६९)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (३७४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१४७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

पुणे: बाधित रुग्ण- (१८,०१५), बरे झालेले रुग्ण- (९७०६), मृत्यू- (६५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६५०)

सातारा:  बाधित रुग्ण- (८९१), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

सांगली: बाधित रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७७४), बरे झालेले रुग्ण- (७००), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२४४०), बरे झालेले रुग्ण- (१३२१), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८३)

नाशिक: बाधित रुग्ण- (३२७६), बरे झालेले रुग्ण- (१७७३), मृत्यू- (१९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (२३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधित रुग्ण- (२६५२), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (९०), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

धुळे: बाधित रुग्ण- (६१५), बरे झालेले रुग्ण- (३७२), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (४०८४), बरे झालेले रुग्ण- (२०५०), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२३)

जालना: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

बीड: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

परभणी: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६५), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

नांदेड: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण (२२५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

अमरावती: बाधित रुग्ण- (४८६), बरे झालेले रुग्ण- (३३२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

अकोला: बाधित रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (८२७), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५३)

वाशिम: बाधित रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४१८), बरे झालेले रुग्ण- (९६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१५), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०३), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१२१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)

एकूण: बाधित रुग्ण-(१,४७,७४१), बरे झालेले रुग्ण- (७७,४५३), मृत्यू- (६९३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६३,३४२)

 (टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९१ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ४०, ठाणे जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत मनपामधील ३१, पालघर -४, सोलापूर -४, मालेगाव – १, यवतमाळ -१, जळगाव – १ आणि पुणे -१ यांचा समावेश आहे.  हे ८३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी
आज ३६६१ जणांना घरी सोडले

मुंबई, दि. २५ : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात ‘ॲण्टीजेन’ पाठोपाठ ‘अँटी बॉडीज्’ चाचण्या करण्याचा निर्णय – आरोग्यमंत्री 
राज्यात ‘ॲण्टीजेन’ पाठोपाठ ‘अँटी बॉडीज्’ चाचण्या करण्याचा निर्णय – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोनावरील प्रभावी औषधे जून अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार

मुंबई, दि.२५:  राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रति किमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात २००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयंबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह संवादातील ठळक मुद्दे असे:

· कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत समिती नेमण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रति किमी दर निश्चित केले जातील. त्यानुसार रुग्णांकडून दराची आकारणी होईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. सामान्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

· कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील.

·  राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परिक्षा ऑगस्टमध्ये नियोजीत आहे. मात्र हे विद्यार्थी परिक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे.

· शहरी भागातील आरोग्य सेवेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समन्वय व्हावा यासाठी यपुढे संचालक (शहरी आरोग्य) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्याची येत्या दोन दिवसात नियुक्ती केली जाईल.

· ग्रामीण भागात आशा वर्कर ७४ प्रकारचे विविध कामे करतात त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे आशा वर्कर आता १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवी शकतात. गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

·  कोरोना बरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रीसुत्री अंगीकारावी लागेल. यातील एस म्हणजे सोशल डिस्टसिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.

· राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे.

· मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. ॲण्टीजेन आणि ॲण्टीबॉडी चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *