जालना जिल्ह्यातील 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरूवात

जालना ,१६ मार्च  /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्यातील 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास बुधवारी शहरातील पाणीवेस येथील आरोग्य केंद्रात सुरूवात झाली.जिल्ह्यास 30 हजार कार्बोवॅक्स लसींचे डोस प्राप्त झाले  असल्याची माहिती माता व बाल संगोपन अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली.

Displaying 1647428859012.jpg

जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 1 लाख 12 हजार 500 मुले  आहेत. या सर्व मुलांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान शाळेत जाऊन लसीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले.. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल सोनी, नगर परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. गणेश काळे, डॉ. संगीता राजे, डॉ. व्ही. एस. चव्हाण, श्रीकांत वाघमारे,  प्रतीक गायकवाड, मंगल बनसोडे, प्रीती घोरपडे, वैशाली निकाळजे, रंजना काळे  उपस्थित होत्या.