औरंगाबाद खंडपीठ वकील संघटनेचे माजी अध्यक्ष विजय गंगापूरवाला यांचे निधन

औरंगाबाद,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद खंडपीठ वकील संघटनेचे माजी अध्यक्ष व जुन्या पिढीतील जेष्ठ वकील विजय गोवर्धनदास गंगापूरवाला (८६) यांचे आज वृद्धापकाळाने, अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैâलासनगर येथील स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि आडत व्यापारी संदीप गंगापूरवाला आहेत.

 खाराकुआ  निवासी विजय गंगापूरवाला शहरातील अतिशय नामांकीत वकील होते. मिलिंद महाविद्यालयातील शिक्षणानंतर त्यांनी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात आपले एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले व साधारणत: १९५९ मध्ये  जिल्हा न्यायालयातून त्यांनी वकिली व्यवसायास सुरवात केली. त्यांनी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात विद्याथ्र्यांना शिकवलेही. त्यांचे मराठी, गुजराथी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. शासकीय अभियोक्ता म्हणून तसेच इंडियन ऑईल कार्पोरेशनचे व बँक ऑफ इंडियाचे वकील म्हणून त्यांची कारकीर्द गाजलेली होती. ते सहायक शासकीय अभियोक्ताही होते. त्यांनी अनेक फौजदारी आणि दिवाणी  प्रकरणे न्यायालयात चांगल्या प्रकारे हाताळली. तसेच त्यांनी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. ते मराठवाडा विधी आणि महिला शिक्षण समितीचे अध्यक्षही होते.

श्रद्धांजली सभा शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी  दुपारी 4 ते 6 राहते घरी (“गोवर्धनगिरी”, खाराकुआ ) येथे आयोजित केली आहे.