बदली झालेल्या १७ न्‍यायाधीशांना निरोप

औरंगाबाद ,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- जिल्हा सरकारी वकील व लोक अभियोक्ता कार्यालयातर्फे मंगळवारी दि.२६ आयोजित निरोप समारंभात सेवा निवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.डी. टेकाळे यांना शाल , श्रीफळ व पुष्‍पगुच्‍छ देवून निरोप देण्‍यात आला. तर बदली झालेल्या १७ न्‍यायाधीशांना शाल  व पुष्‍पगुच्‍छ देवून निरोप देण्‍यात आला. यावेळी जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एम.एस. देशपांडे आणि एस.एस. भिष्‍मा यांनी प्रतिनिधीक मनोगत व्‍यक्त केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता एस.जी. मुप्पिडवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्ताविक अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी सादर केली. सहायक सरकारी वकील अॅड. मधुकर आहेर यांनी सुत्रसंचालन, सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सेवानिवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.डी. टेकाळे यांची केलेल्या जीवन प्रवासाला उजाळा दिला. तर अॅड. धनंजय वाकणकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश के.आर. चौधरी, एस.के. कुलकर्णी, एस.एस. देशपांडे, एस.जे. रामगडिया, व्ही.बी. पारगावकर, एस.एम. आगरकर तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.एम. तुवर, ए.एस. पंडागळे, एस.एन. मोरवाले उपस्थित होते.

तसेच सरकारी वकील के.एन. पवार, डि.के. नागुला, अरविंद बागुल, शरद बांगर, बि.आर. लोया, आर.एस. पहाडिया, आर.सी. कुलकर्णी, व्ही.के. कोटेचा, एस.एस. बर्वे, एन.एन. पवार, एस.एम. सोनटक्के, ए.बी. येगावकर, डी.ए. वाकणकर, एम.एम. अदवंत, ए.बी. करंडे, एस.बी. सूर्यवंशी व बी.एन. आढावे तसेच कर्मचार्यांची यावेळी उपस्थिती होती.

बदली झालेल्या न्‍यायाधीशांची नावे

जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. भिष्‍मा, एस.जी. गिरधारी, टी.जी. मिटकरी, आर.एस. निंबाळकर, व्‍ही.पी. कदम, एम.एस. देशपांडे, ए.ए. कुलकर्णी, ए.आर. कुरेशी, एम.ए. मोटे, मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर, दिवाणी न्‍यायाधीश (व.स्‍त) पी.आर. शिंदे, जे.एम. अंबोडकर, एन.व्‍ही. बन्‍सल, आर.एन. बन्‍सल, पी.एस. कुलकर्णी, आय.के. सुर्यवंशी, के.आय. खान